आज अजमीर सौंदाणे येथे अनोखा उपक्रम राबविण्यात आला अजमीर सौंदाणेचे माजी उपसरपंच मा.मंगेश काशिनाथ पवार यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार करण्याचे कारण असं कि मागील काही दिवसांपासून अजमीर सौंदाणे येथील एकलव्य रेसिडेन्सीं स्कुल येथे जो आदीवासी मुला मुलींना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ठेगोंडा येथील पाणीपुरवठा योजनेतंर्गत जो पाण्याचा पुरवठा होत
होता.तो पुरवठा कमी झाला आणि पाण्याची फारच टंचाई भासू लागली व त्यावेळी तालुक्यातील व गावांतील सामाजिक कार्यकर्ते व अजमीर सौंदाणेचे माजी उपसरपंच मा.मंगेश काशिनाथ पवार यांनी स्वता शाळेच्या मुख्याध्यापक मा अशोकजी बच्छाव सरांना भेटुन त्यांनी स्वताच्या विहीरीचे पिण्याचे पाणी शाळेला उपलब्ध करून दिले ते पण विनामुल्य अशी ऐन उन्हाळ्यात पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली हे महान कार्य मंगेश काशिनाथ पवार यांनी केले.उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी आहे व अनेकांनी मंगेश काशिनाथ पवार यांचा आदर्श घेऊन असेच कार्य केले पाहिजे.यांचे कार्य बघुन अजमीर सौंदाणे येथील आदीवासी बांधवांनी मंगेश पवार यांचा सत्कार केला.त्यावेळी सत्कार करताना उपस्थित असणारे माजी सरपंच भुर्याबाई माळी,शाळेचे प्राध्यापक अशोक बच्छाव ,भुषण पवार, राहुल मगर,दिपक शेवाळे,पप्पु पवार,किरण जाधव सर,अमोल पवार, मुन्ना पवार, राहुल जाधव, यांच्या हस्ते महादंडनायक भगवान विर एकलव्य यांच्या पुतळ्याला नारळ फोडले व माजी उपसरपंच मंगेश काशिनाथ पवार यांचा सत्कार अजमीर सौंदाणेचे माजी सरपंच भुर्याबाई उत्तम माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
व त्यावेळी निलेश देवरे व एकलव्य स्कुलचे प्रा.अशोक बच्छाव यांनी मंगेश काशिनाथ पवार यांनी केलेल्या या महान कार्याबद्दल आदीवासी बांधवांना त्यांचे कार्य सांगितले व त्यावेळी उपस्थित सचिन सोनवणे,गुलाब माळी, रमेश पवार, भगवान माळी, कृष्णा पवार,अशोक सोनवणे, नारायण माळी,रमेश माळी, गणेश माळी,संजय धोडंगे, राहुल माळी,दिपक माळी,ग्यानदेव माळी, दिपक गायकवाड ,विशाल धोंडगे, कृष्णा बर्डे,बारकु पवार,भारत माळी,भाऊसा सोनवणे,सूरेश गायकवाड,सुभाष माळी,बंडु माळी,विलास सोनवणे, तात्या माळी,दादा मोरे, राहुल सोनवणे,नयन धोंडगे,पूर्वश माळी,विकास पवार, दिनेश धोंडगे,शरद सरदार, मच्छिंद्र काकळीज,जालींदर काकळीज,योगेश धिवरे, महेंद्र माळी,आदी समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होतेे
1 Comments