हेमंतकुमार पाटील चले जाओ, पोलीस प्रशासन मूर्दाबाद नारे देत बिरसा फायटरने दर्शवला विरोध!
शहादा प्रतिनिधी: हेमंतकुमार पाटील चले जाओ, पोलीस प्रशासन मूर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत शहादा पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांचा बिरसा फायटर्सच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा कार्यालयासमोर दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२,वाजता विरोध प्रदर्शन करण्यात आले.वादग्रस्त ,जातीयवादी, आरोपीत हेमंतकुमार पाटील यांची पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा पदावरची नियुक्ती तात्काळ रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,सुरेश पवार, रामदास मुसळदे, दिपक ठाकरे,विकास ठाकरे,गंगाराम पवार, प्रविण ईश्वी, दिनेश वाघ,सुभाष पवार, श्रावण मोरे,वनसिंग पटले ,किसन वसावे,सुनिल वसावे,जामसिंग वसावे,हाना वसावे,जयसिंग वळवी,दिपक तडवी,सागर गोसावी,कपिल चव्हाण, पप्पू आर्या,मुन्ना पावरा,रोहित पावरा,राजेंद्र पावरा,रविंद्र पावरा,राजू पावरा,सुभाष पावरा,सतीश ठाकरे,सुनिल पवार आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यात सट्टा जुगार अशा वाढत्या अवैद्य धंद्याच्या कारणास्तव तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस ठाणे शहादा यांची बदली होऊन त्यांच्या जागी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नियुक्ती केल्याचे वृत्त मिळाले आहे.बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत असतांना नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदूरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुष पणे मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्याविरोधात सुशिलकुमार पावरा यांनी मा.न्यायालय, नंदुरबार येथे तक्रार नोंद केली असून संबंधित पोलीस अधिकारी आरोपी आहेत.
पोलीस कस्टडीत बॅडमिंटन हाॅल मध्ये १४२ आंदोलकांना बंदिस्त करून हेमंतकुमार पाटील
यांनी जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक त्रास देत अत्याचार केले. शहादा सारख्या आदिवासी बहूल तालुक्याच्या ठिकाणी वादग्रस्त, जातीयवादी व आरोपीत हेमंतकुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे नियुक्ती करून जाणीवपूर्वक षडयंत्र करत आहेत. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी व पोलिसांच्या चूकीच्या कृत्याबद्दल विरोध करणा-या सामाजिक कार्यकर्त्यास खोट्या गुन्ह्य़ात अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे हे कटकारस्थान आहे अशा वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांची नंदूरबार जिल्हाबाहेर दूर बदली करण्यात यावी.अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल,याची नोंद घ्यावी,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलीस प्रशासनास देण्यात आलेला आहे.


0 Comments