Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र; पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे तक्रार दाखल


"नयना हेमंत पाटील" असे अपरिचित व्यक्तीचे नाव ; आरोपी हेमंत पाटील यांच्याशी संबंधित अपरिचित व्यक्ती असल्याची शंका

नंदुरबार प्रतिनिधी: सुशिलकुमार पावरा यांना पुन्हा खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र कटकारस्थान हे केस नंबर ४११/२०२५ जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार मधील आरोपीत पोलिस अधिकारी करीत असल्याबाबतची तक्रार तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी पोलिस अधीक्षक नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप यांच्या कडे दिनांक २१/९/२०२६ रोजी दाखल केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,मोबाईल क्रमांक 9209445674 या अपरिचित - अनोळखी व्यक्ती व मोबाईल नंबर वरून सुशिलकुमार पावरा यांना वारंवार फोन करून त्रास दिला जात आहे .truecaller ट्रूकॉलर वर "Nayana Hemant Patil" असे अपरिचित-अनोळखी व्यक्तीचे नाव येत आहे.केस नंबर ४११/२०२५ पोलिस कोठडीत जातीवाचक अश्लील व वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा केसमध्ये हेमंत पाटील पोलिस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार , श्रवण दत्त तत्कालीन पोलिस अधीक्षक नंदुरबार,आशित कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार , हेमंतकुमार पाटील पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी हेमंत पाटील या आरोपींशी नयना हेमंत पाटील यांचा काही तरी संबंध किंवा नाते असल्याची शंका निर्माण केली जात आहे.
                     यापूर्वी संबंधित आरोपीत पोलिसांकडून दिनांक २५/१/२०२६ रोजी सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात प्रभूदत्तनगर येथे रात्री घरात घुसून खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती त्यानंतर ८/८/२०२६ रोजी पुन्हा सुशिलकुमार पावरा यांच्या घरात रात्री १० पेक्षा अधिक पोलिस विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून खोटा व बनावट गुन्ह्यात अडकवण्यासाठी आरोपीत हेमंतकुमार पाटील यांनी पाठवले होते .तत्कालीन पोलिस निरीक्षक निलेश देसले पोलिस ठाणे शहादा यांच्या कडून बाईचा- महिलेचा खोटा व गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.असा आरोप सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.भविष्यात माझ्या विरोधात कोणतीही खोटी व बनावट तक्रार दाखल झाल्यास किंवा मला किंवा माझ्या परिवाराला जिवीतास धोका निर्माण झाल्यास केस नंबर ४११/२०२५ मधील संबंधित आरोपीत पोलिसांना जबाबदार धरण्यात यावे, अशी तक्रार सुशिलकुमार पावरा यांनी पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments