Advertisement

१ सप्टेंबरला नाशिक येथे आदिवासींचा उलगुलान महामोर्चा ; बिरसा फायटर्सचे आवाहन


शहादा प्रतिनिधी: १ सप्टेंबर २०२६  सकाळी १० वाजता  गोल्फ क्लब मैदान ते आदिवासी विकास भवन नाशिक पर्यंत आदिवासींचा उलगुलान महामोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी गेल्या २० दिवसांपासून गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिरसा फायटर्स संघटना या मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील हजारों कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. 
                  आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंश होऊन मृत्यू मूखी पडलेल्या ३ विद्यार्थीनींच्या पालकांना १ कोटी रुपये व जखमी ३ विद्यार्थींनींच्या पालकांना ५० लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे .सेंट्रल किचन योजना कायमची बंद झाली पाहिजे.पेसा पदभरती झाली पाहिजे.बोगस आदिवासींवर कारवाई झालीच पाहिजे.डिबीटी योजना बंद झाली पाहिजे.अशा विविध मागण्यासाठी हा उलगुलान महामोर्चा होणार आहे.आम्ही बिरसा फायटर्स येतोय तुम्हीही या,अभी नहीं तो कभी नहीं. सरकारला आपली आदिवासींची एकजूट दाखवून देऊ या.आदिवासींची ताकद सरकारला दिसली पाहिजे म्हणून लाखोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हा.हक की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिसका जमीर जिंदा है वो खुद चले आते! अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments