विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिले विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांना निर्देश पत्र
शहादा प्रतिनिधी:नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग करून मनमानी, असंवेधानीक, बेकायदेशीर रित्या रात्री बेरात्री विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून घरात घुसून आदिवासी महिलांवर व बालकांवर, आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यावर तसेच सर्व सामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणान्या अन्याय, अत्याचारा विरोधातल्या मागण्यांसाठी सुशिलकुमार पावरा यांनी दिनांक १२/०८/२०१६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आपले ५११ वे आमरण उपोषण छेडले आहे. विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिनांक १२/८/२०२६ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांना मागण्यांबाबत कार्यवाही करून उपोषण कर्त्याला उपोषणापासून परावृत करावे, असे निर्देश पत्र दिले आहे.तरी दुसऱ्या दिवशीही सुशिलकुमार पावरा यांनी आपल्या भुमिकेवर ठाम राहत आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्याना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढान्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने, भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणा-या भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी, गुंड प्रवृत्तीच्या वादग्रस्त नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना सेवेतून बडतर्फ करा. ९ सामाजिक कार्यकर्त्यावरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा . नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा.माझ्या राहत्या घरात मी नसताना माझी पत्नी व लहान मुले झोपलेले असताना दिनांक ८/८/२०२६ रोजी रात्री १० ते १९ वाजे दरम्यान अचानकपणे विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून घरात घुसून माझ्या परिवाराला त्रास देणान्या शहादा पोलीस ठाण्यातील ७ ते १० पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करा व सेवेतून बडतर्फ करा. महिलेवर लैंगिक अत्याचार, विनयभंग, जबरदस्तीने शारीरिक संबंध व इतर प्रकरणी गुन्हे दाखल असलेला पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील पोलिस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या वर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा. पदावरून तात्काळ हटवा.तत्कालीन शहादा पोलिस निरीक्षक निलेश देसले व उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.


0 Comments