नंदुरबार प्रतिनिधी: नंदुरबार गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नंदुरबार जिल्ह्यातून नाशिक येथे हाकलपट्टी म्हणजेच बदली करण्यात आली आहे.बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कस्टडीत असतांनाजातीवाचक ,अश्लील व वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात केस नंबर ४११/२०२५ अन्वये खटला सुरू आहे.या केसमध्ये आणखीन ३ पोलिस अधिकारी आरोपी आहेत. जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्याकांड मधील संशयित आरोपी म्हणून हेमंत पाटील पोलिस निरीक्षक यांच्या वर संघटनांनी आरोप केले असून प्रकरणाची एस आय टी चौकशीची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.या प्रकरणात एक पोलिस नाशिक सेंट्रल जेल मध्ये बंदीस्त आहे.सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्याकांड प्रकरणात हेमंत पाटील पोलिस निरीक्षक यांना आरोपी करण्यात आले आहे. तसा तक्रार अर्ज सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे. कारण सुशिलकुमार पावरा यांच्या वर पोलिसांचा अत्याचार सुरू असताना त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती.
तत्कालीन पोलिस निरीक्षक निलेश देसले पोलिस ठाणे शहादा यांच्या विरोधातली तक्रार मागे घेण्यासाठी हेमंत पाटील पोलिस निरीक्षक यांनी दत्ता पवार उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा यांच्या कार्यालयात येऊन दबाव आणला होता.परंतू तक्रार मागे घेतली नाही म्हणून हेमंत पाटील यांनी सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला,असाही आरोप तक्रार दार सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे. हेमंत पाटील यांची बदली झाल्यानंतर दिनांक ९/८/२०२६ रोजी आदिवासी समाजातर्फे फटाके फोडून नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला व हेमंत पाटील यांच्या चुकीच्या कामांचा निषेध करण्यात आला.यापूर्वी वादग्रस्त तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांची नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी- बदली झाल्यानंतर नंदुरबार मधील जनतेने फटाके फोडून नाचून आनंदोत्सव साजरा केला होता.


0 Comments