Advertisement

नंदुरबारचे तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त व विजय चौधरी यांच्या ऑडीओ रेकार्डींगची चौकशी करून श्रवण दत्त यांना बडतर्फ करा - बिरसा फायटर्सची मागणी

 

गृहमंत्री व अपर मुख्य सचिव यांना निवेदन; मोबाईल्स जप्त करण्याची मागणी

नंदुरबार  प्रतिनिधी : नंदुरबारचे वादग्रस्त तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त व श्री. विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची निष्पक्ष चौकशी करून, दोष आढळल्यास पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,अपर सचिव गृहविभाग, पोलिस महासंचालक मुंबई यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त व श्री. विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर आले आहे. 
                      सदर ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कथितपणे संवेदनशील, राजकीय नेत्यांशी अगदी जवळचे संबंध ठेवत नेत्यांच्या इशा-यावर श्रवण दत्त काम करत असल्याचे व आपल्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार तसेच वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करू नये याबाबतचे संभाषण दिसून येते. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त यांनी विरसा फाईटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुशिलकुमार पावरा यांना जातीवाचक ,अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. केस नंबर ४११/२०२५ नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालय येथे सुरू आहे.तसेच, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आपल्याला पदाचा व अधिकाराचा दुरूपयोग करून असंवेधानीकरित्या ९ (नऊ) सामाजिक कार्यकर्त्याना जिल्हा हद्दपार केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करण्यात आले.अशा अवैध व गैरकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे.
                     पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा मोबाईल जप्त करण्यात यावा. सदर ऑडिओ रेकॉर्डिंगची तातडीने जप्ती करून त्याची फॉरेन्सिक / सायवर तज्ज्ञांमार्फत सत्यता व प्रामाणिकता तपासण्यात यावी.ऑडिओमध्ये सहभागी व्यकींची ओळख व संभाषणाची पार्श्वभूमी याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, पदाचा गैरवापर, अधिकारांचा दुरूपयोग किंवा शासकीय सेवकाच्या आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरूद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. चौकशी निष्षक्षपणे पार पडण्यासाठी आवश्यक असल्यास पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त यांना चौकशी पूर्ण होईपर्यत पदावरून दूर ठेवण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा.सदर प्रकरणातील चौकशीचा अहवाल व करण्यात आलेल्या कारवाईची माहिती संबंधित तक्रारदारास देण्यात यावी. वरील प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments