Advertisement

शहादा पोलिसांनी केलेल्या चोरीची तक्रार मुंबईहून नाशिकला वर्ग!

राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई ऐवजी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे होणार सुनावणी

नंदुरबार प्रतिनिधी:-माझ्या राहत्या घरात रात्री विना वर्दीत, तोंडाला मास्क व रूमाल बांधून चोराच्या रूपात अचानकपणे घूसून -सॅमसंग ए ७० मोबाईल, गॅस सिलिंडर, पैसे, कागदपत्रे, प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तू घरातून चोरी केल्याबद्दल चोरी करणे, दरोडा टाकणे, धक्काबुक्की करून बळजबरीने मोबाईल हिसकावणे, पत्नी, मुला, मुलीशी गैरवर्तन करणे, अपमानास्पद वागणूक देणे, कपडे घालू न देणे, गल्लीत ओढून नेत सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद व अपमानास्पद वागणूक देणे, वाईट शिविगाळ करून धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्नकरणे, पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलिसांविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणणे, खोटा व बनावट गुन्हा दाखल करणे, इत्यादी गैरवर्तना बद्दल संबंधित पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करणेबाबत व सेवेतून बडतर्फ करा ,अशा स्वरूपाचा  तक्रार अर्ज मा . अध्यक्ष, राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई यांच्या कडे तक्रारदार सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी २१ मे २०२६ रोजी केला होता.
                  सदर तक्रार अर्ज सी वी धांडोरे प्रशासकीय अधिकारी यांनी २२ जून २०२६ रोजी  विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिक यांच्या कडे वर्ग केला आहे. या प्रकरणात शहादा पोलिस ठाण्यातील श्री. हेमंतकुमार पाटील, पोलिस निरीक्षक,श्री प्रविण सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक , श्री. युवराज पाटील,श्री. घनश्याम सूर्यवंशी,दिपक चौधरी रात्री विना वर्दीत व तोंडाला मास्क व रूमाल बांधून घरात घुसलेले पोलिस कर्मचारी,हे पोलिस की डाकू? यांच्या गैरवर्तणूकीची तक्रार करण्यात आली आहे.६ महिने तक्रार अर्ज दाखल करूनही जाणीवपूर्वक आरोपी पोलिसांना वाचविण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त व उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील हे अद्यापही गुन्हा नोंद करायला लावत नाहीत. या प्रकरणात ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही गुन्हा नोंद न करणा-या श्री. हेमंतकुमार पाटील पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा ,श्री. दत्ता पवार उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा व श्री श्रवण दत्त पोलिस अधीक्षक नंदुरबार यांना सदर गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे व कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments