बिरसा फायटर्सवर वाढता विश्वास; महाराष्ट्रात सर्वाधिक शाखा असणारी आदिवासी संघटना म्हणून ओळख!
शहादा प्रतिनिधी:-दिनांक २९ जुलै २०२६ रोजी शहादा तालुक्यातील दूधखेडा या गावात बिरसा फायटर्सच्या ३८५ व्या शाखेचे आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून शानदार उद्घाटन करण्यात आले.बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली व कोषाध्यक्ष पप्पू अवाया, कार्याध्यक्ष बिरबल पावरा, तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,पानसेमल अध्यक्ष विजय बरडे,विजय सोलंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत बिरसा फायटर्स गाव शाखा दूधखेडा शाखेचे फलक अनावरण करण्यात आले.
सुरज शामराव चव्हाण यांची गाव अध्यक्ष पदी तर अतुल मंगा खर्डे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. योगेंद्र शामराव चव्हाण कार्यध्यक्ष,गोरख भिमसिंग कोषाध्यक्ष, निलेश काग्रेस खर्डे सह सचिव,शरद युवराज भिल सचिव,गोपाल विजय चव्हाण,बादल कैलास भिल,पवन भावसिंग पावरा,शिवलू शिवदास भिल यांची सदस्य पदी तर सौ. मंन्जु दिनेश पावरा यांची महिला प्रतिनिधी पदी हेंमत मंगा खर्डे ,शिरीष उदेसिंग पटले सदस्य अशी गाव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाची एक लढाऊ सामाजिक संघटना असून आदिवासी समाजावर होणा-या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देते. विद्यार्थी, महिला,शेतकरी, कर्मचारी इत्यादींच्या विषयांबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते पाणी वीज शाळा अंगणवाडी दवाखाना इत्यादी मुलभूत सुविधांसाठी शासनदरबारी निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी कामे करते.अशी बिरसा फायटर्स संघटनेबद्धल राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी माहिती दिली.नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांना नियुक्ती पत्र व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.भगवान बिरसा मुंडा की जय, वीर एकलव्य की जय, क्रांती वीर खाज्या नाईक की जय, डॉ.बाबासाहेब की जय,याहामोगी माता की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक शाखा असणारी आदिवासी संघटना म्हणून बिरसा फायटर्सची ओळख निर्माण झाली आहे.


0 Comments