बदली होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही पद सोडत नसल्याने गृह विभागाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह
नंदुरबार प्रतिनिधी: साडेतीन कोटी रूपये आपली बदली रद्द करण्यासाठी हेमंत पाटील पोलिस निरीक्षक एलसीबी नंदुरबार यांनी गृहविभागाला दिले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे,असा गंभीर आरोप बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केला होता. बदली होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही हेमंत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत आहेत.नाशिक येथे बदलीच्या ठिकाणी अद्यापही हजर झाले नाही.त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि विशेषतः पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या बदलीच्या संदर्भात अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुप्रिया पाटील -यादव यांनी राज्यातील १५० पोलिस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश दिले आहेत.त्यानूसार हेमंत पाटील पोलिस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे.
बदली आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? कोणाचा दबाव आहे? कोणाच्या आशिर्वादाने / संरक्षणामुळे अधिकारी पदावर कायम आहेत? वादग्रस्त पोलिस निरीक्षकाच्या माध्यमातून पुन्हा नंदुरबार जिल्ह्यात एखादे मोठं कांड करायचे आहे का?माझ्या वर किंवा अन्य व्यक्तींवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून टार्गेट करायचे आहे का ? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले पाहिजेत.हेमंत पाटील पोलिस निरीक्षक यांच्या वर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक अश्लील व वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालय येथे केस नंबर ४११/२०२५ खटला सुरू आहे.हेमंत पाटील हे सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या खून/ हत्याप्रकरणात संशयित आरोपी आहेत. हेमंत पाटील यांच्या वर जळगाव न्यायालयात ४२० चा खटला सुरू आहे.हेमंत पाटील यांची तत्कालीन आयजी यांनी २ वार्षिक वेतन वाढ ची शिक्षा सुनावली आहे.“बदलीचे आदेश कागदावर नकोत; त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. पैशांच्या कथित व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हे शासनाने कृतीतून दाखवावे.”अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.


0 Comments