एकूण १३ गुन्हे तरी आरोपींना अटक नाही; दोंडाईचा पोलिसांच्या कामगिरीवर शंका!
नंदुरबार प्रतिनिधी : दोंडाईचा शहर पोलिस ठाणे येथे ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी धुळे, पोलिस अधीक्षक धुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी धुळे व पोलिस निरीक्षक दोंडाईचा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जगदीश डुडवे, लक्ष्मी बाई पावरा सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दोंडाईचा शहरात घडलेल्या एका निंदनीय घटनेप्रकरणी काही समजा कंटकांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत व भारतीय न्याय दंड संहिता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. निलेश सोमनाथ वाघ , राहणार दोंडाईचा जिल्हा धुळे यांनी दिनांक १५ जून २०२६ रोजी दोंडाईचा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.( गुन्हा क्रमांक १८५/२०२६)( दोंडाईचा शहर पोलिस स्टेशन ता.शिंदखेडा जिल्हा धुळे) नूसार संशयित आरोपी विजय शिवाजी मराठे,सचिन विजय मराठे,राहुल उर्फ विशाल विजय मराठे,महेंद्र शिंदे सर्व राहणार चैनिरोड दोंडाइचा ताशिंदखेडा ज, दोंडाईचा, धुळे, महाराष्ट्र, भारत यांच्या वर अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिंबधक) अधिनियम, १९८९ अन्वये कलम 3(1)(r),3(1)(s),3(1)(w),3(1)(1),3(2)(va) व भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 अन्वये कलम 109,118(1),74,115(2),351(2),351(3),352 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तरी गुन्हा दाखल होउन एक महिनीचा कालावधी निघून गेला असून अजून एक ही आरोपी अटक केला नाही.ही अत्यंत गंभीर बाब आहे.आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल असूनही, ते मोकाट फिरत असून, त्यांच्या गुन्हेगारी वर्तनामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे आरोपी अवैध दारूचे धंदे चालवणे, बोगस ताडी विक्री करणे आणि अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असण्याबद्दल कुप्रसिद्ध आहेत.ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्हे हे अजामीनपात्र असतात आणि कायद्यानुसार त्यांची तातडीने अटक होणे आवश्यक असते.पोलिस प्रशासनाचा आशीर्वादाने आरोपी मोकाट फिरत असल्याने, ते पीडित किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतात व पुरावे मिटवण्याचा पर्यंत करू शकता जी एक अतिशय गंभीर बाब आहे.त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलिस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.


0 Comments