मी रात्री घरात पोलिस पाठवले नाही - पोलिस अधीक्षक अश्विनी सानप
माझ्या घरात रात्री विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून पोलिस कोणी पाठवले, सुशिलकुमार पावरा यांचा सवाल
शहादा प्रतिनिधी:नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग करून मनमानी, असंवेधानीक, बेकायदेशीर रित्या रात्री बेरात्री विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून घरात घुसून आदिवासी महिलांवर व बालकांवर, आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यावर तसेच सर्व सामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणान्या अन्याय, अत्याचारा विरोधातल्या मागण्यांसाठी सुशिलकुमार पावरा यांनी दिनांक १२/०८/२०१६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आपले ५११ वे आमरण उपोषण छेडले आहे. तिसऱ्या दिवशीही आपले आमरण उपोषण सुशिलकुमार पावरा यांनी सुरूच ठेवले आहे.
माझ्या राहत्या घरात प्रभूदत्तनगर तालुका शहादा येथे मी नसताना माझी पत्नी व लहान मुले झोपलेले असताना दिनांक ८/८/२०२६ रोजी रात्री १० ते १९ वाजे दरम्यान अचानकपणे विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून घरात पोलिस कोणी पाठवले? शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी की आमदार चंद्रकांत रघुवंशी की अन्य कोणी पाठवले?याचे उत्तर शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी द्यावे.मी याबाबत पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांना फोन करून विचारले असता मी तुमच्या घरात रात्री पोलिस पाठवलेच नाही,असे उत्तर पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सुशिलकुमार पावरा यांनी दिले आहे.पोलीस अधिक्षक यांनी रात्री पोलिस पाठवले नाही,तर हेमंतकुमार पाटील हे आपल्या मनानुसार रात्री बेरात्री घरात पोलिस पाठवून मनमानी कारभार करत आहेत.वरिष्ठांचे ऐकून काम करत नाही.महिलेवर लैंगिक अत्याचार , विनयभंग , जबरदस्तीने शारीरिक संबंध सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना हेमंतकुमार पाटील यांना पुन्हा पोलिस सेवेत घेतले कसे ? असा सवाल सुशिलकुमार पावरा यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत माझ्या मागण्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी उपोषण स्थळावरून हलणार नाही,अशी ठाम प्रतिक्रिया उपोषण कर्ते सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


0 Comments