Advertisement

शहाणा गावात दारूबंदी साठी आदिवासी महिला आक्रमक; पोलिस निरीक्षक व सरपंच यांना निवेदन

शहादा प्रतिनिधी :  शहादा तालुक्यातील शहाणा या गावात दारूबंदी करा, अशी आक्रमक मागणी गावांतील आदिवासी महिलांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा व सरपंच ग्रामपंचायत शहाणा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना आदिवासी महिला आक्रमक झाल्या.८ दिवसांत दारू बंद केली नाही तर दारू विकणा-यांविरूद्ध कायदेशीर तक्रार केली जाईल,असा इशारा आदिवासी महिलांकडून देण्यात आला आहे.दिनांक २७/८/२०२६ रोजी ग्रामसभेत दारूबंदी बाबत ठराव मांडण्यात आला असून ठराव मंजूर करून लवकरच दारूबंदी केली जाईल, असे आश्वासन सरपंच यांनी दिले आहे.निवेदनावर गुरीबाई जगदीश डुडवे,ईमलाबाई डेमा सुळे,चेतनाबाई भाईदास भंडारी, लक्ष्मीबाई भारत ठाकरे,नर्मदा संजय नावडे,कलावती गोपाल भंडारी,रूनीबाई राजाराम सुळे, लक्ष्मी पवनसिंग पवार,ऊमा जितेंद्र भंडारी,गुड्डी दिपक तडवी सह १०० पेक्षा अधिक आदिवासी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
             निवेदनात म्हटले आहे की,शहाणा गावात मोठया प्रमाणावर अवैध दारूची विक्री व सेवन सूरू आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत आहे तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होत आहेत. महिलांवर व मुलांवर मानसिक व शारीरिक अत्याचार होत आहेत. घरगुती हिंसाचार, भांडणे, आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक हानी यांना गावातील नागरिक दररोज सामोरे जात आहेत.आमच्या गावातील महिला, माता-भथिनी व नागरिकांनी अनेक बेळा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे; मात्र अवैध दारूविक्रीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे गावातील परिसर दारूमुक्त होणे अत्यावश्यक झाले आहे.त्यामुळे आपण शहाणा ता. शहादा जिल्हा नंदुरबार या गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचे आदेश द्यावेव आणि अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करून गावाला दारूमुक्त करावे, अशी मागणी

Post a Comment

0 Comments