*तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, हेमंतकुमार पाटील सह आमदार चंद्रकांत रघुवंशी हे संशयित आरोपी*
धडगाव प्रतिनिधी:माझे वडील स्व. जहांगीर फेंदा पावरा यांच्या हत्या/मृत्यू प्रकरणात तत्कालीन नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा हेमंतकुमार पाटील, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्यासह इतर संशयित व्यक्तींच्या भूमिकेची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करून, दोष आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार सुशिलकुमार पावरा यांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे धडगाव जिल्हा नंदुरबार यांच्या कडे दाखल केली आहे.
तक्रार अर्जात नमूद केले आहे की,माझे वडील स्व. जहांगीर फेंदा पावरा यांच्या हत्या / मृत्यू प्रकरणाबाबत मला गंभीर शंका असून, सदर प्रकरणाच्या तपासामध्ये संबंधित काही व्यक्तींची भूमिका, त्यांच्यातील संभाव्य संपर्क तसेच उपलब्ध पुराव्यांची निष्पक्षपणे तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. सदर प्रकरणात तत्कालीन नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा हेमंतकुमार पाटील, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्यासह इतर संशयित व्यक्तींच्या भूमिकेबाबत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.माझ्या वडिलांचा मूतदेह चुलवड गावाजवळील गौ-या येथील केटी विहीर - नदीत दिनांक १/३/२०२६ रोजी आढळून आला होता. मूतदेहाच्या कपाळावर, डोक्यावर धारधार वस्तूचे धाव लागून रक्त वाहत होते, इतर ठिकाणीही जखमा होऊन रक्त वाहत होते, अशा संशयास्पद अवस्थेत वडिलांचा मूत्यदेह आढळून आला होता.मला पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणारे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचा माझ्या वर अत्याचार सुरू असतानाच माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे.विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी व इतर जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्याप्रकरणी चंद्रकांत रघुवंशी यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आम्ही मा. जिल्हाधिकारी नंदुरबार व वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदन दिले होते व या विषयावर आमची आंदोलन सुरु होती. तसेच आदिवासी संघटना हह्या तीनपाट आहेत, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी जातीवाचक शब्द प्रयोग करून आमचा सार्बजनिक ठिकाणी अपमान केल्याबद्दल चंद्रकांत रघुवंशी यांच्याविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार येथे मी दिनांक २१/०६/२०२५ रोजी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांचा माझ्या वर व्यक्तीशा राग होता, सुबुद्धी, द्वैष होता. त्यामुळे मला पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणात व माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणात चंद्रकांत रघुवंशी यांच्या वर दाट शंका निर्माण होते.
माझे वडील स्व. जहांगीर फेंदा पावरा यांच्या हत्या/मृत्यू प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.वरील नमूद व्यक्तींसह इतर संशयित व्यक्तींच्या भूमिकेची कायदेशीर पद्धतीने चौकशी करून, त्यांच्याविरूद्ध प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करणारे पुरावे आढळल्यास संबंधित कायद्द्यांनुसार FIR दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी. तपासामध्ये दोषारोपास पात्र ठरणारे पुरावे आढळल्यास संबंधित संशयितांना कायदयानुसार ताब्यात घेऊन/अटक करून चौकशी करण्यात यावी.संबंधित व्यक्तींचे मोबाईल फोन, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आवश्यक असल्यास लोकशन रेकॉर्ड, इलेक्ट्रॉनिक संवाद तसेच इतर डिजिटल पुरावे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून सुरक्षित व जप्त करण्यात यावेत आणि त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. घटनास्थळाशी संबंधित कागदपत्रे, पोलीस तपासातील नोंदी, पंचनामे, जबाब, फॉरेन्सिक अहवाल, उपलब्ध फोटो, विडीओ फुटेल तसेच इतर सर्व संबंधित पुराव्यांची पुनर्तपासणी करण्यात यावी. सदर प्रकरणातील तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप, दबाव किंवा हितसंबंध निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक यंत्रणेपासून स्वतंत्र असलेल्या वरिष्ठ अधिकान्यांच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा.प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आवश्यक असल्यास SIT (विशेष तपास पथक), CBI किंवा इतर स्वतंत्र सक्षम तपास यंत्रणेकडे तपास सोपविण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा. तपासादरम्यान दोषी आढळणान्या कोणत्याही व्यक्तीचा पद, राजकीय प्रभाव किंवा शासकीय जबाबदारी विचारात न घेता कायद्यानुसार कठोर फौजदारी व विभागीय कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार करण्यात आली आहे.


0 Comments