Advertisement

E20 इथेनॉल पेट्रोल बंद करण्याची बिरसा फायटर्सची मागणी


शहादा प्रतिनिधी : E20 इथेनॉल पेट्रोल बंद करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री नवी दिल्ली यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                 भारत सरकारकडून इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण (E20) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, E20 इंधन सर्व वाहनांसाठी योग्य नाही. विशेषतः जुनी वाहने, दोन चाकी, तीन चाकी, लहान वाहने व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची वाहने E20 साठी अनुकूल नसल्याने त्याचा इंजिनवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मायलेज कमी होणे, पिकअप कमी होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे व देखभाल खर्च वाढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांवर याचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे E20 इथेनॉल पेट्रोलची सक्ती थांबवून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वाहनाच्या गरजेनुसार योग्य इंधन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.E20 इथेनॉल पेट्रोलची सक्ती तात्काळ बंद करावी. पूर्वीप्रमाणे पेट्रोल (E5 किंवा त्यापेक्षा कमी इथेनॉल मिश्रित) पर्याय म्हणून उपलब्ध करून द्यावे.जुन्या वाहनांसाठी E20 चा अपाय होतो का? याचा तांत्रिक अभ्यास सार्वजनिक करावा.वाहनधारकांना त्यांच्या वाहनानुसार योग्य इंधन निवडीचा पर्याय द्यावा. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा.अशा मागण्या बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments