Advertisement

पोलिस आहेत की चोर? शहादा पोलिसांबाबत महिलांचा सवाल!


खोटा व बनावट गुन्हा बनवतात, आम्ही बघितले, ग्रामस्थांची साक्ष!

विना वर्दीत तोंडाला रूमाल बांधून रात्री बेरात्री घरात घुसतात;महिला व लहान मुलांवर अत्याचार करतात!

शहादा प्रतिनिधी:- शहादा पोलिस ठाण्यातील पोलिस हे विना वर्दीत, तोंडाला रूमाल बांधून कोणाच्याही घरात रात्री बेरात्री घरात घुसतात व महिला व मुलांवर जबरदस्तीने अत्याचार करतात.कोणताही गुन्हा नसताना कोणालाही अटक करून घेऊन जातात. खोटा व बनावट गुन्हा बनवतात,खोटा गुन्हा दाखल करून अटक करतात. स्वतः पोलिसांची गाडी फोडून घेतात, स्वतः दगडे ठेवतात. स्वतः फोटो व विडीओ काढतात.बनावट व खोटा गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देतात. विना वर्दीत व तोंडाला रूमाल बांधून रात्री बेरात्री घरात घूसणारे हे पोलिस आहेत की चोर आहेत? आम्ही कसे ओळखायचे? असा गंभीर सवाल शहादा येथील महिलांनी केला आहे.             पोलिस आहेत तर यांनी दिवसा यावं.रात्री बेरात्री विना वर्दीत तोंडाला रुमाल बांधून का येतात? घरात महिला,मुली,बायका,लहान पोरं असतात.हे काहीही बघत नाहीत ,केव्हाही घरात घुसून कोणालाही अटक करून घेऊन जातात.या पोलिसांना कायदा आहे किंवा नाही. विना नोटीस, विना समन्स बजावता व कोणतेही कारण नसतांना शहादा पोलिस ठाण्यातील पोलिस हे आमच्या गावात रात्री बेरात्री घरात घुसून आम्हाला मानसिक व शारीरिक त्रास देतात.यांच्या भितीमुळे आमची मुलं व आम्ही लपत फिरत आहोत.पोलिसांचा अत्याचार वाढला आहे.अशीही प्रतिक्रिया गावांतील रहिवाशांनी दिली आहे.                 बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या घरात रात्री बेरात्री विना वर्दीत मास्क व रूमाल बांधून केव्हाही शहादा येथील पोलिस घुसतात व काहीही कारण न सांगता जबरदस्तीने अटक करून घेऊन जातात.यांनी रस्त्यात मारून फेकून दिले तर आम्ही कोणाला जबाबदार धरायचे?सुशिलकुमार पावरा हे आदिवासी समाजासाठी चांगले काम करत आहेत.परंतु शहादा येथील पोलिस सुशिल भाऊला जबरदस्तीने अटक करून घेऊन जातात व नंतर दुसऱ्या दिवशी स्वतः गाडीजवळ दगडे ठेवतात.बनावट व खोटा गुन्हा बनवतात व आम्हालाही अटक करण्याची धमकी देतात. रात्री विना वर्दीत तोंडाला रूमाल बांधून आमच्या घरात घुसणारे हे पोलिस आहेत की चोर आहेत? असा गंभीर आरोप शहादा येथील महिलांनी केला आहे.
              शहादा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सोनवणे, युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दिपक चौधरी सह विना वर्दीत तोंडाला रूमाल बांधून रात्री बेरात्री घरात घुसणा-या शहादा पोलिस ठाण्यातील पोलिसांवर चोरी करणे ,दरोडा, महिला व लहान मुलांवर  जबरदस्ती करणे,खोटा व बनावट गुन्हा बनवणे, खोटा व बनावट गुन्ह्यात अटक करणे, गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी व दमदाटी करणे,अशे गंभीर आरोप आहेत.

Post a Comment

0 Comments