Advertisement

शिक्षक सुभाष बोरसे यांची हत्या करणाऱ्या पोलिसांना फाशी द्या - बिरसा फायटर्सची मागणी


९०% पोलिस भ्रष्ट व नालायक, फक्त १०% पोलिस प्रामाणिक -सुशिलकुमार पावरा

नंदुरबार  प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांना अमानुषपणे मारहाण करून हत्या प्रकरणाची जलद न्यायालयात खटला चालवून हत्या करणाऱ्या आरोपीत पोलिसांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक मुंबई व विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                            निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पांढऱ्या चारचाकी गाडीतून आलेल्या वाळू माफिया व पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी ठिक ठिकाणी आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा गैरवापर करून सर्व सामान्य माणसांवर सरकारी कामाच्या निमित्ताने किंवा असंवेधानीक पद्धतीने खोटे आरोप, खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न व हत्या करतात.नंतर प्रकरण दडपतात.नंदूरबार येथील तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या वर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला व त्यांच्या वडिलांची हत्या केली.असे गंभीर आरोप असणारे निवेदन आपणास वारंवार पाठवली आहेत.तरी आपण हत्यारे , खुनी,भ्रष्ट , गुंड , नालायक पोलिस अधिकाऱ्यांना पाठीशी घालून सर्व सामान्य माणसांवर अन्याय करत आहेत.मुख्यमंत्री स्वतः काही कारवाई करत नाहीत, म्हणून काही पोलिस अधिकारी हे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दूरूपयोग करून सर्व सामान्य माणसांवर दिवसेंदिवस अत्याचार करत आहेत.पोलिसांकडून हत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.महाराष्ट्रात ९०% पोलिस भ्रष्ट व नालायक आहेत व फक्त १०% पोलिस प्रामाणिक आहेत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
             ‌.       वेरूळ येथील शिक्षकाच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.शिक्षकाच्या पत्नी अनिता बोरसे यांनी या अनुषंगाने तक्रार दाखल केली. पोलिसांनीच शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हाणामारी करताना एक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हजर होते, असाही आरोप केला जात आहे.आईसक्रिम आणि स्वतःला सर्दी झाल्याने गोळ्या आणण्यासाठी सुरेश बोरसे घराबाहेर पडले होते. त्यांच्याबरोबर १२ वर्षाचा त्यांचा भाचा होता.बोरसे यांच्याबरोबर गेलेल्या भाच्याने ' मामाला कोणीतरी मारत आहे,' असा निरोप दिला. काळ्या रंगाची नंबर नसलेल्या एका गाडीत बोरसे बसवले जात होते. बोरसे यांच्या मुलीने गाडीला अडवून ' माझ्या वडिलांना कुठे घेऊन जात आहात, असा प्रश्न विचारला. यावर पांढरा शर्ट आणि निळी जिन्सची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने आम्ही पोलीस आहोत. आमच्या कामात दखल दिली म्हणून आम्ही घेऊन चाललो आहोत, असे सांगितले. त्या कालावधीतच शिक्षक सुभाष बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments