Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना राज्यस्तरीय "कर्तव्यदक्ष" पुरस्कार २०२६ !


नंदुरबार प्रतिनिधी:- सामाजिक कार्यकर्ता तथा  बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना राज्यस्तरीय "कर्तव्यदक्ष" पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. संकल्प बहूउद्देशीय संस्था अकोला आयोजित जून महिन्यात शेगांव येथे पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यापूर्वी सुशिलकुमार पावरा यांना २०२१ मध्ये 'इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड' (International Idol Award 2021) हा सामाजिक सेवेतील मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.त्यांनी दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना इंटरनॅशनल, युनीवर्स क्वीन व सनान्सी ना बायडम ऑफ्रीकन स्कॉलर व सोशल अॅक्टीवीस्ट यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
                      सुशिलकुमार पावरा यांची ५०८ वेळा उपोषण करणारे उपोषण कर्ता, लढाऊ, गायक, नृत्यक,लेखक ,कवी,कराटेपटू, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स म्हणूनही विशेष ओळख आहे. त्यांना टिक टॉक स्टार म्हणून ही लोक ओळखू लागले होते. आपल्या गायकी व नृत्याने सुशिलकुमार पावरा यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती. आदिवासी समाजाच्या आदिवासी समाजाच्या वाटसप ग्रुपवर,फेसबुक व सोशल मिडियावर सुशिलकुमार पावरा यांच्या कामाला अधिक पसंती दर्शवली जात आहे.संगीत, गायन, वादन, नृत्य, आरोग्य, समाजसेवा इत्यादी. विविध क्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरी करणा-या पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार दिला जातो. माझ्या साठी हा पुरस्कार खूपच महत्वाचा आहे. कारण या पुरस्कारामुळे समाजमानसात माझी चांगली ओळख निर्माण झाली आहे. समाजसेवा करताना मला खूपच अडचणी व संकटे आलीत तरी कुठेही न डगमगता आजही मी माझे सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे व पुढेही सुरूच ठेवणार आहे. समाजसेवेत संघर्ष कामगिरी केल्यामुळेच मला हा पुरस्कार बक्षीस म्हणून जाहीर झाला आहे. असे मत सुशीलकुमार पावरा यांनी यावेळी व्यक्त केले आहे.सुशिलकुमार पावरा यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल आदिवासी समाजबांधवांकडून व इतर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments