नंदुरबार प्रतिनिधी:- उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील दलित आंदोलनकर्त्यां कार्यकर्ते व मृतिका ललिता गौतम यांच्या नातेवाईकांवर लाठीचार्ज करून शिवीगाळ करत पोलिस वाहनांमध्ये अमानुषपणे मारहाण करणाऱ्या एस एसपी अविनाश पांडे यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, मेरठ येथील ललिता गौतम या एका दलित मुलीच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी दलित संघटनांनी व मृतिका ललिता गौतम यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय मेरठ समोर आंदोलन सुरू केले होते.आंदोलन दरम्यान मेरठचे एस एसपी अविनाश पांडे तेथे येऊन,"सडक क्या तुम्हारे बाप की है क्या,पुरी सडक गंधी करदी "असे म्हणत आंदोलन कर्त्यांवर लाठीचार्ज करायला लावले व हाताने मारहाण करत पोलिस गाडीत बंदिस्त असणा-या आंदोलन कर्त्यांना गाडीचा दरवाजा उघडून अमानुषपणे मारहाण करु लागले.तसा विडीओ सोशल मिडियावर वायरल होत आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.एस एसपी अविनाश पांडे यांच्या या कृत्याचा देशभर संताप व्यक्त केला जात आहे.रक्षकच भक्षक झाले आहेत.पोलीस स्वतः कायदा पाळत नाहीत.वातावरण खराब करतात.आंदोलन करणे हा भारतीय राज्य घटनेनुसार प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे . परंतु न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलन कर्त्यांनाच अशा प्रकारे पोलिसच अमानुषपणे मारहाण करत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे.अविनाश पांडे हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून गुंडागर्दी करत आहेत.त्यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


0 Comments