Advertisement

अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार

आदिवासी तरुणांना खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून टार्गेट करत असल्याचे आशित कांबळेवर आरोप !

नंदुरबार प्रतिनिधी:-आशित कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार हे आदिवासी कार्यकर्त्यांवर खोटे व गुन्हे दाखल करायला लावून आदिवासी समाजातील लोकांना टार्गेट करत असल्याबद्दल योग्य ती कारवाई करा , अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे दिनांक २३ जुलै २०२६ रोजी च्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की,आशिष कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी दिनांक २२/०७/२०२६ रोजी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात नोटीस घ्यायला आलेल्या विजय बरडे व मांगीलाल सेनानी यांच्या हातातील मोबाईल हिसकावून,त्यांना अटक करण्याची धमकी देत आदिवासी कार्यकर्त्यांना पुन्हा टार्गेट केले असल्याची बाब समोर आली आहे.आशिष कांबळे हा बौद्ध -SC समाजाचे अपर पोलीस अधीक्षक आहे.आशित कांबळे हा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक , अश्लील व वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.(केस नंबर ४११/२०२५ नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालय) 
                डॉ वर्षा लहाडें तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या भ्रष्टाचारविरोधात* आदिवासी संघटनांनी तब्बल ३४ दिवस आंदोलन केले होते.त्या आंदोलनात आदिवासी संघटनांनी माघार घेतली नाही.खैरवे- भडगांव ता शहादा येथील पोलिस पाटील धनराज उत्तम पान पाटील हा आदिवासी महिलांना व तरूणांना रात्री अमानुषपणे मारहाण करून अत्याचार करायचा त्याविरोधात आदिवासी संघटनांनी प्रांत अधिकारी शहादा यांच्या कडे तक्रार दाखल केली होती, पोलिस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांना पदावरून हटविण्याची मागणी करत आंदोलन केले होते. डॉ वर्षा लहाडें व धनराज उत्तम पान पाटील हे दोन्ही बौद्ध समाजाचे म्हणजेच आशित कांबळे यांच्या जातीचे आहेत.
                 पोलिस उपनिरीक्षक निकिता पाटील व ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शहर पोलिस ठाणे नंदुरबार यांनी तुम्ही नोटीस घ्यायला या,आम्ही लगेच तुम्हाला सोडून देऊ.१५ मिनिटे लागतील.तुमच्याविरोधात विडीओ चा जामिनपात्र गुन्हा आहे.आधारकार्ड घेऊन या,म्हणत नोटीस बजावून बोलावलं होते.परंतु त्या ठिकाणी काही संबंध नसताना अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे आले कशे? ५० हजार रुपये रक्कमेचा बंध पत्र व जामीन खत जबरदस्तीने लिहून घेण्यात आला .तेथील सीसीटीव्ही खुटेज विडीओ तपासणी करून आशित कांबळे वर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments