Advertisement

दिल्ली येथील आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणा-या पोलिसांवर कठोर कारवाईची बिरसा फायटर्सची मागणी

राष्ट्रपती द्रोपदी मृर्मु यांना निवेदन; घटनेचा केला निषेध

नंदुरबार प्रतिनिधी -वैज्ञानिक तथा शिक्षा सुधारक  सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थनार्थ दिनांक २० जुलै २०२६ रोजी जंतर मंतर मैदान दिल्ली ते संसद भवन दिल्ली पर्यंत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चात विद्यार्थ्यावर लाठीचार्ज व अश्रुधुरांचा वापर करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर व विना वर्दीतील गुंडावर कायदेशीर कठोर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक २२ जुलै २०२६ रोजी च्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                       वैज्ञानिक तथा शिक्षासुधारक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थनार्थ दिनांक २० जुलै २०२६ रोजी जंतर मंतर मैदान दिल्ली ते संसद भवन दिल्ली पर्यंत निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चात विद्यार्थ्यावर लाठीचार्ज व अश्रुधुरांचा वापर करून अमानुषपणे मारहाण केली.या मारहाणीत हजारो विद्यार्थी व महिला जखमी झाले आहेत.सरकारने दडपशाही वापरून पोलिस बळाचा दुरूपयोग करून आंदोलन विद्यार्थी व महिलांवर अमानुषपणे मारहाण करून अत्याचार केला आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट-यूजी पेपरफुटी व अन्य मुद्द्यांवरून सीजेपी (CJP - Cockroach Janata Party) आणि इतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना सोमवारी(२० जुलै) ही निंदनीय घटना घडली.
              नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.मोर्चा दाबण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला . त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला व लाठीचार्ज केला.या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले आहेत.या दडपशाहीचा निषेध केला जात आहे.  दिनांक २० जुलै २०२६ रोजी आंदोलन कर्त्यांवर अमानुषपणे मारहाण केल्याच्या घटनेनंतर भारत देशात लोकशाही संपली आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारने आपली दडपशाही बंद करावी व विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.

Post a Comment

0 Comments