शहादा प्रतिनिधी : आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा देत असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पाठविण्यात आले आहे.पाठिंबा पत्र तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत.विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान देणे, संचमान्यतेचे जाचक निकष रद्द करणे आणि शिक्षकांना बीएलओ (BLO) सारख्या गैर-शैक्षणिक कामांमधून मुक्त करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्यात यावे. मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेत शिक्षकांना बीएलओ (Booth Level Officer) म्हणून काम दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, यातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करावे. ऑनलाइन संचमान्यतेच्या (विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवणे) घातक निकषांमुळे शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे।शिक्षक अभियोग्यता चाचणी (TET/CTET) नियम, पदोन्नती प्रक्रियेतील त्रुटी आणि सेवा सुरक्षेचे प्रश्न इत्यादी अनेक मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे,त्या आंदोलनाला बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments