नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांकडून खोटे व बनावट गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले - सुशिलकुमार पावरा
शहादा प्रतिनिधी:- नंदुरबार येथील एमकेडी कालेजविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की," खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल" अशा मथळ्याची दैनिक नंददर्शन या वृत्तपत्रातातील बातमी वाचून धक्का बसला. नंदुरबार तालुक्यातील सोनगीरमाडा फाटा कॅम्समध्ये असलेल्या एमकेडी कॉलेजमध्ये विद्याथ्यांची भरलेली फी परत करावी यासाठी विद्याथ्यांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनास पाठींबा देवून आदित्य अजबसिंग पाडवी, राहुल पावरा या दोघांनी चिथावणी देत संस्थेच्या मॅनेजमेंट स्टॉफ व आमदार यांचा रस्ता अडविला. तसेच तुम्हाला कॉलेज चालवायचीअसेल तर १५ ते २० लाख रुपये आम्हाला द्या, अशी जाळपोळ, तोडफोड व मागणी दोघांनी केली. तसेच शिक्षकांना मारहाण केली. याबाबत धनंजय नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य अजबसिंग पाडवी, राहूल पावरा या दोघांविरुद्ध भा. न्या.सं.चे कलम ३०८ (२) (३), ५४, ६० (बी), १२७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
महोदय, गेल्या अनेक दिवसांपासून एमकेडी कालेजविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी आंदोलन कर्त्यां विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल करून आवाज दाबणे हे उचित नाही.खंडणी, मारहाण, जाळपोळ, तोडफोड आंदोलन कर्त्यांनी केले, असे बातमीत नमूद करण्यात आले आहे. मागील काही घटनांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस हे आंदोलन कर्त्यांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करून आपल्या पदाचा दुरुपयोग करतात व पोलिसच कायद्याचे पालन करीत नाहीत,अशी जनभावना निर्माण झालेली आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे,एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात आल्यापासून पोलिसांकडून खोटे व बनावट गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


0 Comments