शहादा प्रतिनिधी :- मलगाव ग्रामपंचायत ता. शहादा (दि. 29 जून 2026): शहादा तालुक्यातील मलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे संजीवनी फाउंडेशन, असलोद यांच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी मोफत पीएम किसान सन्मान निधी योजना e-KYC शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी e-KYC करणे अनिवार्य असल्याने अनेक शेतकरी बांधवांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले e-KYC पूर्ण केले. शिबिरामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले तसेच e-KYC प्रक्रिया पूर्णपणे मोफत व तत्काळ करण्यात आली.
यावेळी संजीवनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी शेतकरी बांधवांना आवाहन करत सांगितले की, "पीएम किसान योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने वेळेत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संजीवनी फाउंडेशन सातत्याने अशा मोफत सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत मलगावचे सहकार्य लाभले. उपस्थित शेतकरी बांधवांनी संजीवनी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा जनहिताच्या सेवा भविष्यातही सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
– डॉ. राहुल पाटील
संस्थापक अध्यक्ष, संजीवनी फाउंडेशन, असलोद
संपर्क : +91 89756 61001


0 Comments