मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन
नंदुरबार प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील शहाणा येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासी राहत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत , निवासी राहत नसणा-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नंदुरबार व आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहाणा येथे एकूण ३६ कर्मचारी पैकी फक्त १७ कर्माचारी कार्यरत आहेत .गेल्या ४ वर्षांपासून १९ पदे रिक्त आहेत . शहाणा परिसरातील अनेक गावांतील रूग्ण या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु अपुरे कर्मचारी व आरोग्य केंद्रात निवासी न राहणारे कर्मचारी व इतर गैर सोयीमुळे उपचार पूर्ण होत नाहीत. गरोदर महिला व गंभीर आजाराचे रूग्णांचे हाल होत आहेत.आरोग्य केंद्रात साफ सफाई ठेवली जात नाही, अस्वच्छता दिसून येते.कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्य केंद्र ठिकाणी निवासी राहत नाहीत, फक्त एक एएनएम आरोग्य सेविका निवासी राहते.त्यामुळे रूग्णांचे गैरसोय होते.म्हणून शहादा तालुक्यातील शहाणा येथील आरोग्य केंद्रात निवासी न राहणा-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व निवासी राहण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments