नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार येथील नवापूर चौफुली येथे १०९ फुटाचे भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी संघटनांच्या मागणीवरून नवापूर चौफुलीत भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याचे ठरले असून तेथे ८.५ फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे भूमिपूजन झाल्याचे समजते. या चांगल्या कामाचे आम्ही मनापासून कौतुक करतो.मात्र, नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा आहे, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासीचे आराध्य देवत, महान स्वातंत्र्यसेनानी आणि 'धरती आबा' आहेत. त्यांचे स्मारक हे केबळ नंदुरबारच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरावे. ८.५ फूट उंचींचे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे वाटत नाही.स्मारकाची उंची: ८.५ फूट ऐवजी १०९ फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात यावा. या प्रकल्पासाठी लागणारा निधी नंदुरबार जिल्हाातील आदिवासी ४ आमदार व १ खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून तसेच नगरपालिका व शासनाच्या इतर योजनांमधून उपलब्ध करावा. या पवित्र कार्यासाठी नंदुरबारची जनता देखील आर्थिक सहभाग देण्यास तयार आहे. त्यासाठी स्वतंत्र 'बिरसा मुंडा स्मारक निधी' सुरू करावा. तरी नंदुरबार येथील नवापूर चौफुली येथे १०९ फुटाचे भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणेत यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे करण्यात आली आहे.


0 Comments