जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन; देशभरातील आदिवासी सहभागी होणार!
नंदुरबार प्रतिनिधी:- डेडियापाडा विधानसभा मतदारसंघाचे आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांच्या समर्थनार्थ ४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार पर्यंत आदिवासींचा आक्रोश मोर्चा होणार आहे.मोर्चाचे निवेदन बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिनांक २८ जून २०२६ रोजी दिले आहे.यावेळी *बिरसा फायटर्सचे नंदुरबार तालुका अध्यक्ष किसन वळवी,किसन वळवी,नानू वळवी,काल्ला वळवी,दिवाल्या वळवी,सोन्या वळवी, छगन वळवी, गोविंद वळवी,सुनिल वळवी,वासुदेव नाईक, मोगराबाई मोजू सारपा वसावे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, डेडियापाडा विधानसभा मतदारसंघ गुजरात येथील आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांना त्यांच्या पत्नीसह ९ जणांना वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून ७ वर्षाची शिक्षा झाली आहे, त्यांना अटक करून राजपिपला जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.या निर्णयाविरोधात संपूर्ण आदिवासी समाजात सरकार व न्याय व्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी आहे.या निर्णयाचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून विरोध करतो आणि आमदार चेतरभाई वसावा यांचे जाहीर समर्थन करतो. चेतरभाई वसावा हे आदिवासींच्या विषयांवर कायम आवाज उठवतात.
आदिवासींच्या जल, जंगल व जमीन संरक्षणासाठी लढत असतात.ते आदिवासी समाजाचे नेते आहेत.त्यांना सरकार मधील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कट कारस्थान रचून खोट्या केसमध्ये अडकवून ही शिक्षा द्यायला लावली आहे.ही लोकशाहीची एक प्रकारे हत्या आहे.सरकार आपल्या मनमानी व हुकुमशाही कारभाराने जे आदिवासींसाठी लढत आहेत त्या समाजसेवकांना खोट्या केसेस मध्ये अडकवून आदिवासींचा आवाज दाबण्याचा काम करत आहे.याविरोधात आदिवासी समाजात व जनतेत तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे.सरकारने आमदार चेतरभाई वसावा यांना त्रास देणं बंद करावे.त्यांना खरा न्याय द्यावा, या मागणीसाठी आदिवासी समाजाचा नंदुरबार येथे ४ जुलैला हा आक्रोश मोर्चा निघणार आहे.या मोर्चात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश सह देशभरातून लाखो आदिवासी शामिल होणार आहेत.


0 Comments