Advertisement

बिरसा फायटरच्या रावेर तालुकाध्यक्षपदी समीर वकील यांची निवड

रावेर प्रतिनिधी:-रावेर तालुक्यातील समीर वकील यांची बिरसा फायटरच्या तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. समीर वकील यांनी बिरसा फायटर्सचे समाजासाठी केलेले कार्य बघून त्यांनी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटना मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली, तेव्हा बिरसा फायटर्सचे कमिटीने या विषयावर चर्चा करुन समीर वकील यांची रावेर तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. आदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृती, संवर्धनासाठी संविधानिक हक्क, अधिकार, आरक्षण वाचविण्यासाठी, लोकशाही मागणी लढा देणे, आदिवासी समाजाची ही गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या वैचारिक, सामाजिक लढाऊ संघटनेची निमिर्ती केली आहे.

Post a Comment

0 Comments