Advertisement

पावसाळा सुरू झाला की पूलाचे काम सुरू करतात आणि पावसाळा संपला की काम बंद करतात; भ्रष्टाचाराचा अजब प्रकार!


गौ-या ते चूलवड पुलाचे ३ वर्षांपासून काम अपूर्णच;बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा!

धडगाव प्रतिनिधी:- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रा.मा.८ ते गौ-या रस्ता सा क्र.२/०४० पुलाचे बांधकाम करणे,ता.अक्राणी जिल्हा नंदुरबार या पुलाचे भुमिपूजन डॉ विजयकुमार गावीत माजी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व हिना विजयकुमार गावित माजी खासदार नंदुरबार लोकसभा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली गौ-या गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष अक्राणी यांच्या उपस्थितीत दिनांक २२/०४/२०२३ रोजी कामाचे उद्घाटन संपन्न झाले. या पुलाच्या बांधकामासाठी करोडो रुपये अंदाजीत रक्कम मंजूर करण्यात आली.परंतू तब्बल ३ वर्षं पूर्ण झाली.तरी अद्यापही या पुलाचे काम पूर्ण झाले नाही.त्यामुळे गौ-या ते चूलवड या गावा परिसरातील लोकांना नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
                        पावसाळ्यात रस्ते खोदकाम व दुरुस्तीच्या कामांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (साधारणतः ३१ मे किंवा जूनच्या सुरुवातीला) रस्ता रस्ते व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करणे बंधनकारक असते.पावसाळ्यात नवीन रस्ते खोदण्यास किंवा काँक्रिटीकरणास पूर्णपणे बंदी असते.आधीच खोदलेले रस्ते, केबलचे खड्डे किंवा चेंबरची कामे पावसाळ्यापूर्वी डांबर किंवा खडी टाकून तातडीने बुजवावे लागतात.काम अर्धवट असल्यास तिथे बॅरिकेड्स, धोक्याचे फलक आणि रात्रीच्या वेळी दिशादर्शक दिवे लावणे कंत्राटदाराला बंधनकारक असते.परंतू गौ-या ते चूलवड पुलाचे बांधकाम हे पावसाळ्यात सुरू करतात आणि पावसाळा संपला की पुलाचे काम बंद करतात, यातून ठेकेदाराला बांधकामात भ्रष्टाचार करायला वाव मिळतो,पु-याच्या पाण्याने पूल वाहून गेला, बांधकाम वाहून गेले,असा खोटा अहवाल सादर करून भ्रष्टाचार केला जातो.या पुलाचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्सचे धडगाव तालुका अध्यक्ष सुनिल तडवी यांनी संघटनेतर्फे दिला आहे.

Post a Comment

0 Comments