गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार; सरपंचावर भ्रष्टाचाराचे आरोप!
शहादा प्रतिनिधी:- रमेश नगराज पवार, सरपंच, ग्रामपंचायत दूधखेडा ता शहादा यांनी गोपाल विजय पावरा भारतीय सैनिक यांना वाईट शिविगाळ करून धमकी देऊन गैरवर्तन केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (कलम १४) अंतर्गत गैरवर्तनूक प्रकरणी सरपंचाला अपात्र करा व सन २०२२-२३ ते सन २०२६ -२७ या कालावधीतील ग्रामपंचायत दूधखेडा येथील निधी, खर्च ,विकासकामांची चौकशी करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया,सुरज चव्हाण ,अतुल पावरा ,रोहित पावरा ,गोपाल पावरा ,रंजीत पावरा,निलेश पावरा,पृथ्वीराज चव्हाण ,गोरख चौधरी ,रंजीत पवार ,श्रावण मोरे,मंगल पावरा ,बादल भील,शरद पटले ,शिरीष पटले,पवन पटले ,भिम ठाकरे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,रमेश नगराज पवार सरपंच,दूधखेडा ग्रामपंचायत यांनी गावातील गोपाल विजय पावरा व अतुल मंगा खर्डे या दोघांना गावातील विकासकामांबद्धल विचारपूस केली म्हणून "तु नीट राहा,तुला लास्ट वार्नींग देतो मी, गावांतील कामाबद्दल मला का विचारतो,तू गावांसाठी आतापर्यंत काही केले नाही,तु मला सस्पेन्स करून दाखव,तुला मी काय ते दाखवतो,तुझी काढतो मी,तु चोरटा, तू इथं ये,तुला दाखवतो मी",अशी धमकी दिल्याचे संभाषण पुरावा आहे.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. गावाचा सर्वांगीण विकास करणे, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे, ग्रामसभांचे आयोजन करणे आणि गावातील मूलभूत सुविधांची (पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता) पूर्तता करणे ही सरपंचाची मुख्य जबाबदारी असते.गावातील अंतर्गत वाद मिटवून शांतता व सामंजस्य राखणे ही सरपंचाची सामाजिक जबाबदारी असते.परंतु एका भारतीय सैनिकाला अशा पद्धतीने जीवे ठार मारण्याची धमकी देणे हे सरपंच पदाला अशोभनीय वर्तन आहे.गावात पाणी व इतर अनेक समस्या आहेत,कामे केली जात नाही, विचारपूस केल्यावर सरपंच धमकीची भाषा वापरतो असा आरोप ग्रामस्थांनी तर सरपंच हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतचा मनमानी कारभार चालवतात,असा आरोप ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे.


0 Comments