शहादा प्रतिनिधी - पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या व जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व खासदारकीचा राजीनामा घ्या, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनिता पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,पत्रकारांना शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणा-या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषदेत किंवा प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करत दमदाटी केली होती.आंदोलकांना धमकावताना त्यांनी, 'माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढा, मी याआधी पाच जणांना ठार केले आहे,' अशा आशयाची विधाने सुद्धा केली आहेत. पत्रकार हे लोकशाहीचे चौथा स्तंभ आहेत. निर्भीडपणे अन्याय अत्याचाराविरोधात वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करतात. परंतु खासदार संजय दिना पाटील सारखे गुंड प्रवृत्तीचे खासदार पत्रकारांचा आवाज दाबल्यासाठी पत्रकारांना वाईट शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देतात,हे अत्यंत निंदनीय आहे. पत्रकारांना धमकावणे हा गंभीर गुन्हा आहे .संजय दिना पाटील यांना खासदार पदावरच्या व्यक्तीला हे शोभत नाही.


0 Comments