राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
नंदुरबार प्रतिनिधी :- भूमाफिया तथा वादग्रस्त विधानपरिषद सदस्य श्री.चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांना विधानपरिषद उपसभापतीपदी निवड करू नये,अन्य कोणत्याही सदस्याची निवड करा,आदिवासी आमदार सौ.मंजूळा गावीत साक्री विधानसभा यांच्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत,जर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपदी निवड केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेने दिला आहे.मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या मार्फत पाठविण्यात आले.बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे,विजय पावरा, दिनेश वाघ,पिंपर्डे शाखेचे गंगाधर पवार,शरद पवार, श्रावण वाघ, ईश्वर भील, एकनाथ पावरा, राहूल वाघ, प्रविण ईशी,सागर वाघ,सागर पावरा* आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, भुमाफिया तथा वादग्रस्त विधान परिषद सदस्य श्री.चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी, सरकारी,महारवतन, देवस्थान,ईनामी इत्यादी जमिनी बेकायदेशीर रित्या व अवैध रित्या हडप केल्या आहेत. म्हणून सदर जमिनी मूळ मालकास परत करण्यात याव्यात, सरकार जमा कराव्यात व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वर कायदेशीर कारवाई करा व त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी आदिवासी संघटनांनी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य,मा.मुख्यमंत्री,मा.महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे यापूर्वी अनेकदा निवेदने देऊन केलेली आहेत.शिवाय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी अनेक ठिकाणी आंदोलन सूद्धा केली आहेत.
आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या पदाचा व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सारख्या पोलिस अधिकारीला हाताशी धरून अनेक निरपराध सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला लावतात.जिल्हा हद्दपारी सारखी कारवाई करायला लावतात, आदिवासी तरुणाच्या हत्याकांड प्रकरणात त्यांचं नाव संशयास्पद येत आहे. म्हणून त्यांच्या विरोधात आदिवासी बांधवांचा व आदिवासी संघटनांचा तीव्र विरोध सुरू आहे व संताप निर्माण झालेला आहे.अशा वादग्रस्त व्यक्तीला विधानपरिषद उपसभापतीपदी निवड करण्यात यावी, अशी चुकीची मागणी साक्री विधानसभा चे आमदार सौ.मंजूळा गावीत ह्या करत आहेत.त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.


0 Comments