Advertisement

शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणी

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

 शहादा प्रतिनिधी: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा, अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जगदीश डुडवे, लक्ष्मी पावरा सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
              निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करून १००% कर्ज माफ करण्यात यावे म्हणून बिरसा फायटर्सकडून शासनाकडे यापूर्वी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो, परंतु कर्जबाजारीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते,ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्ज माफ करून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
                शेतकऱ्यांनाह २ लाखांपर्यंत कर्जमाफी राज्य सरकारने करावी व‌ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करावी.अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.शेतकरी निराश झालेला आहे.त्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे.तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments