Advertisement

क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा बांदरियावड येथे शानदार अनावरण सोहळा!



सुशिलकुमार पावरा यांचा भूमाफिया व जुलमी पोलिसांवर हल्लाबोल!

शहादा प्रतिनिधी:- दिनांक १७ मे २०२६ रोजी बांदरियावड येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे शानदार अनावरण सोहळा संपन्न झाला.भगवान बिरसा मुंडाच्या प्रतिमेतून आपल्याला बिरसा मुंडा यांच्या विचारांना पुढे न्यायचे आहे,बिरसा मुंडा यांची लढाई सुरू ठेवायची आहे,लढाई जिवंत ठेवायची आहे, आपल्या आदिवासी समाजाला व आपल्या भावी पिढीला बिरसा मुंडा कोण होते? त्यांनी काय केले? तसेच आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास सांगायचा आहे, संपूर्ण समाजाला व देशवासियांना आमचाही कोणीतरी लोकनायक होता,लोकनेता होता, स्वातंत्र्य सेनानी होता, देशभक्त होता, समाजसुधारक होता, भगवान होता हे दाखवून द्यायचे आहे.ही प्रतिमा आम्हाला आमची जल, जंगल व जमीन आणि आमची हक्क व अधिकाराची लढाई लढताना नवी शक्ती, ऊर्जा,जोश व दिशा देईल, आम्हाला मानसिक मजबूती देईल,आमचा इतिहास जिवंत ठेवेल. इंग्रज, सावकार व जमीनदार कडून आदिवासींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी बिरसा मुंडा यांनी उलगुलान आंदोलन आदिवासी विद्रोह आंदोलन सन १८८५- १९०० च्या दरम्यान सुरू केले.या आंदोलनाचा मुख्य उद्देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आदिवासी संस्कृती,परंपरा,ओळख वाचवणे हा होता,जल, जंगल व जमीन चे रक्षण करणे, बाहेरील लोकांनी व जमीनदारांनी आदिवासींची हिसकावलेली पारंपरिक जमिन परत मिळवून देणे व आबुआ दिशूम आबुआ राज म्हणजेच आपल्या देशात आपले राज्य स्थापन करण्याचा होता.
              क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने व आदिवासींच्या जल जंगल जमीन च्या रक्षेसाठी आणि आपल्या हक्क व अधिकारांसाठी सर्व आदिवासी समाजाने एक झाले पाहिजे.तरच आपले हक्क व अधिकार वाचतील,नाहीतर आपल्याला हक्क व अधिकारांपासून वंचित राहावे लागेल. बिरसा मुंडा यांची उलगुलान ची लढाई आपण सुरूच ठेवूया ,असे आपल्याला दमदार भाषणात भुमाफिया व जुलमी पोलिसांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केले.या कार्यक्रमाला पानसेमलचे आमदार श्याम बरडे,सेंधवाचे आमदार मोंटू सोलंकी सह बिरसा फायटर्स,जयस,बिरसा ब्रिगेड,आदिवासी एकता परिषद,भारत मुक्ती मोर्चा सह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन बांदरियावड ग्रामस्थांनी केले.यावेळी भगवान बिरसा मुंडा की जय,बिरसा मुंडा अमर रहे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments