आदिवासींच्या जमिनी अवैध व बेकायदेशीर रित्या हडप केल्याचा आमदार चंद्रकांत रघुवंशीवर आरोप; जिल्हाधिकारी यांना निवेदन
नंदुरबार प्रतिनिधी: भूमाफिया तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघूवंशी यांनी नंदुरबार येथील आदिवासींची जमीन, गुरू चरण,देवस्थान जमीन,इनामी जमीन,कुळ कायदा जमीन, शासकीय जमीन,महार वतन जमीन इत्यादी जमिनी बेकायदेशीर, अवैध रित्या हडप केलेल्या सर्व जमिनींची चौकशी होऊन कारवाई व्हावी,या मागणीसाठी आदिवासी सामाजिक संघटनांचे दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे.यावेळी भारतीय स्वाभीमानी संघाचे राज्य सचिव रोहीदास वळवी, भारत आदिवासी संविधान सेना तथा बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारतीय स्वाभीमानी संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,भूमाफिया तथाआमदार चंद्रकांत बटेसिंग रघूवंशी यांनी नंदुरबार येथील आदिवासींची जमीन, गुरू चरण,देवस्थान जमीन,इनामी जमीन,कुळ कायदा जमीन, शासकीय जमीन,महार वतन जमीन इत्यादी जमिनी बेकायदेशीर, अवैध रित्या हडप केल्याची चौकशी करून कारवाई करणेबाबतचे निवेदन आपणास दिनांक २५ मार्च २०२५ रोजी आदिवासी संघटनांनी दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांना दिनांक १७/०९/२०२५ रोजी पाठवलेले आहे.संघटनांनी निवेदन देऊन १ वर्षे पूर्ण होत आहेत.तरी अद्याप अवैध जमीनीची चौकशी करण्यात आली नाही,ही अत्यंत गंभीर बाब आहे. सदर जमिनींची १५ दिवसांच्या आत चौकशी होऊन सदर जमिनी सरकार जमा न झाल्यास झाल्यास दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.
आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी श्रीमती मित्ताली सेठी यांना निवेदन देऊन एक वर्ष पूर्ण होत आहे.तरी अवैध व बेकायदेशीर जमिनींची चौकशी न करून जिल्हाधिकारी मित्ताली सेठी ह्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना कारवाई पासून वाचवत आहेत,असा गंभीर आरोप आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. "उलटा चोर कोतवाल को कांटे" याप्रमाणे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे विधानपरिषदेत आदिवासींच्या जमिनीबाबत लक्षवेधी मांडत आहेत, परंतु त्यांनी स्वतः आदिवासींच्या व इतर जमिनी अवैध रित्या हडप केल्या आहेत,त्या जमिनी मूळ मालकांस परत करत नाहीत किंवा सरकार जमा करत नाहीत, "आपले ठेवायचे झाकून व दुसऱ्यांचे बघायचे वाकून" असा टोला आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशींना लगावला आहे.


0 Comments