पोलिसांनी खोटा व बनावट गुन्हा बनवला; आम्हाला रात्री बेरात्री त्रास देतात, प्रभूदत्तनगर मधील आदिवासी बांधव आक्रमक!
शहादा प्रतिनिधी : दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजे दरम्यान बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात म्हणजेच आमच्या प्रभूदत्तनगर मधील कालनीत कोणतेही कारण, समन्स, वारन्ट न देता श्री. प्रविण सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. युवराज पाटील, श्री. घनश्याम सूर्यवंशी, श्री दिपक चौधरी व इतर पोलिस यांनी तोंडाला रुमाल, मास्क बांधून विना पोलिस वर्दीत घुसून सुशिलकुमार पावरा यांना कपडेही घालू न देता जबरदस्तीने नेत होते. पोलिस आहेत की ते डाकू होते,हे आम्ही कसे ओळखायचे, असा संतप्त सवाल प्रभूदत्तनगर मधील रहिवाशांनी शहादा येथील पोलिसांवर केला आहे.पोलीस दिवसा न येता रात्री बेरात्री आमच्या गावात येऊन बायका पोरांना त्रास देतात, आम्हालाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात. खोट्या व बनावट गुन्ह्यात आमच्या सगळ्यांची नावे टाकतात.आमच्या मुलांनाही अटक करण्याची धमकी देतात.आम्ही भीत भीत राहतो.पोलीस हे मनमानी कारभार करून आदिवासी लोकांना त्रास देत आहेत.
सुशिलकुमार पावरा यांना २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री जबरदस्तीने घरात घुसून पोलिसांनी नेल्यानंतर पोलिस दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रभूदत्तनगर येथे आमच्या कालनीत आले.पोलीस गाडी उभी केली व दगडे जमवून पोलिस गाडीजवळ ठेवून त्यांनी विडीओ व फोटो काढले.तुम्ही हे काय करत आहेत,असे आम्ही विचारल्यावर पोलिस बोलले की,हे आमचं असंच चालतं.नंतर आम्हाला घाबरून लोणखेडा पुलवर जाऊन पोलिसांनी खोटा व फेक रिपोर्ट बनवला.पोलीस गाडी उभी करून स्वतः पोलिसांनी दगडे जमवून गाडीजवळ ठेवून त्यांनी विडीओ व फोटो काढले,याचा आम्ही विडीओ काढला आहे.
कोणताही गुन्हा नसतांना व कोणतीही नोटीस न देता रात्री बेरात्री कोणाच्याही घरात घुसून कोणालाही अटक करून नेतात,हा कोणता कायदा आहे. पोलिस आपल्या पदाचा दुरूपयोग करून आदिवासी लोकांना त्रास देत आहेत.आदिवासी लोकांवर हा अत्याचार पोलिसांनी थांबवला पाहिजे,अशी प्रतिक्रिया प्रभूदत्तनगर मधील आदिवासी महिला व रहिवाशांनी व्यक्त केली आहे.पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या इशा-यावर शहादा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील हे मला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडवण्यासाठी काम करत आहेत,असा आरोप सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.


0 Comments