Advertisement

वादग्रस्त पोलिस निरीक्षक निलेश देसले यांची बदली; बिरसा फायटर्सच्या निवेदनाचा परिणाम

धनंजय पाटील पोलिस निरीक्षक यांची पोलिस ठाणे नवापूर येथे नियुक्ती

नंदुरबार प्रतिनिधी: पोलीस निरीक्षक श्री. निलेश देसले, पोलीस ठाणे नवापूर, जिल्हा नंदुरबार यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर अन्य जिल्ह्यात तात्काळ बदली करा; त्यांच्याविरोधातील गंभीर तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करा; तसेच मुंबई शहर आयुक्तालयातून अवघ्या एक-दोन महिन्यांत नवापूर येथे झालेल्या नियुक्तीच्या प्रशासकीय प्रक्रियेची चौकशी करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे दिनांक १२ आक्टोबर २०२६ रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाचा परिणाम होऊन गृहविभागाने पोलिस निरीक्षक निलेश देसले यांची अवघ्या २-३ दिवसांतच बदली करून धुळे येथील पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांची पोलिस ठाणे नवापूर येथे नियुक्ती केली आहे.
            पोलीस निरीक्षक श्री. निलेश देसले यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी शहादा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याविरोधात चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु चौकशी अहवाल कुठे गेला, पुढील कारवाई काय झाली? पोलिस प्रशासनाने काहीच माहिती दिली नाही.दिनांक २८ मार्च २०२५ रोजी पिंपर्डे, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून अंदाजे सहा व्यक्तींनी लोखंडी पाईपने मारहाण केली होती,त्यात कृष्णा वाघ जखमी अवस्थेत तक्रार द्यायला पोलिस ठाणे शहादा येथे गेले असताना निलेश देसले पोलिस निरीक्षक यांनी जखमी तक्रारदारालाच मारहाण केली व लाक अप मध्ये बंद करून ठेवले व आरोपींवर कारवाई केली नाही,कारण आरोपी हे निलेश देसले यांच्या जातीचे होते.तुमची तक्रार मी घेणार नाही, तुम्हाला कुठे जायचं तिथे जा , अशी आदिवासी महिलांची तक्रार नाकारत धमकी दिली व सामाजिक कार्यकर्ता सुशिलकुमार पावरा यांना "तुम्ही जर या आदिवासी लोकांची बाजू घेतली तर तुमच्या वरच बाईचा गुन्हा दाखल करून अटक करतो",अशी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दिपाली पावरा हिच्या पोटात चाकू खुपसल्यावरही निलेश देसले यांनी गुन्हा नोंद केला नाही . 
                 दिपाली पावरा हिचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा नोंद केला व आरोपींना अटक केली.निलेश‌ देसले विरोधात आदिवासी संघटनांनी दिनांक २९/३/२०२५ रोजी तक्रार दाखल केली होती.पोलीस अधिक्षक नंदुरबार यांनी २/४/२०२५ रोजी चौकशी आदेश काढला होता.चौकशी अधिकारी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी तक्रार दार , आदिवासी संघटना प्रतिनिधी व साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती.जखमी आदिवासी व्यक्तीला प्रत्यक्षात पाहिले होते.परंतू चौकशी अहवाल संघटनांना दिला नाही.चौकशीचा निष्कर्ष काय काढला ? चौकशी अहवाल गेला कुठे? काहीच समजलं नाही. अशा वादग्रस्त पोलिस निरीक्षक निलेश देसले यांची पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातच नियुक्ती का? ते दुसरीकडे नोकरी करू शकत नाही का? यांचे राजकीय पुढाऱ्यांशी लागेबांधे आहेत व अवैध धंदे व व्यवसाय करणाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत म्हणून पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातच बदली करून येतात. निलेश देसले यांची नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी बदली नाही केली तर बिरसा फायटर्स सह आदिवासी संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स़ संघटनेकडून सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments