Advertisement

शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावरील लोणखेडा चौफूली,कालेज,सुतगिरणी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची बिरसा फायटर्सची मागणी



शहादा प्रतिनिधी : शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावर लोणखेडा चौफूली, सुतगिरणी फाटा,कालेज इत्यादी ठिकाणी गतिरोधक बसवा,अशी मागणी बिरसा फायटर्स़ संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, सुरेश पवार, रामदास मुसळदे, दिलीप मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                निवेदनात म्हटले आहे की, शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावर लोणखेडा चौफूली, सुत गिरणी फाटा, पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालय( लोणखेडा) शहादा येथे वाहनांची वर्दळ असते. कालेजची विद्यार्थी व प्रवाशी पायी प्रवास करुन रस्ता ओलांडतात.या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी असते.या मार्गावर बस, ट्रक, मोटारसायकल व इतर सर्व वाहने सुसाट वेगाने ये जा करतात.रस्ता ओलांडताना मोठे अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते.म्हणून शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावर लोणखेडा चौफूली, सुतगिरणी फाटा,कालेज इत्यादी ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत,अशी मागणी बिरसा फायटर्स़ संघटनेकडून कार्यकारी अभियंता शहादा यांच्या कडे केली आहे.

Post a Comment

0 Comments