Advertisement

सुशिलकुमार पावरा सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना नंदूरबार जिल्हा हद्दपार नोटीस;नंदूरबार जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात महा आंदोलनाचा इशारा!


नंदूरबार प्रतिनिधी: बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्यासह राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,भारतीय स्वाभीमान संघाचे राज्य सचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,तालुकाध्यक्ष अजय वळवी,वकील राहूल कुवर, बिरसा फायटर्सचे शहादाचे दिलीप मुसळदे इत्यादी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना श्री.दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांनी नंदूरबार जिल्हा हद्दपारची कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.ही नोटीस राजकीय सुडभावनेने पाठवली आहे,असे म्हणत सुशिलकुमार पावरा यांनी पोलिसांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
                          आमदार चंद्रकांत रघुवंशी चंदूभैया सारखा माणूस यूपी, बिहार,मध्यप्रदेशमधून नंदूरबार मध्ये येऊन आमच्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर व अवैद्य रित्या हडप करतो,आदिवासींना "तीनपाट" असा जातीवाचक शब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करतो,आदिवासी लोकांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही,अशी खुली धमकी देतो,त्या उप-या माणसाला नंदूरबार मध्ये राहू देणार, आणि आमचा जन्म या नंदूरबार जिल्ह्य़ात झाला,आमची जन्मभूमी व कर्मभूमी नंदूरबार जिल्ह्य़ाच असताना आम्ही जल जंगल जमीन अशा समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढतो, आमच्या आदिवासी तरुणाची खुलेआम रस्त्यावर चाकूने हत्या केली जाते,त्या घटनेचा आम्ही विरोध करतो,म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला अटक केली जाते व वरून आम्हाला नंदूरबार जिल्हा हद्दपार नोटीस पाठवली जाते.नंदूरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची ही कुटनिती आहे. 
                            एखादा आयपीएस अधिकारी जेव्हा नेत्यांच्या इशाऱ्यावर कामे करतो,तेव्हा त्याच्या पदावर,वर्दीवर,लायकीवर प्रश्न चिन्ह निर्माण होतात. मला पोलीस कस्टडीत पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली हे प्रकरण दडपण्यासाठी अशा पद्धतीने बेकायदेशीर नोटीस पाठवून माझ्यावर दबाव आणला जात आहे.नोटीसला आम्ही उत्तर देवूच,परंतू नोटीसीत सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यास टोळी असा चूकीचा शब्द प्रयोग करून संघटनांचा अपमान करीत आहेत. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी भारत देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने आम्ही संघटना चालवतो, त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चांगली कामे करतो.त्या संघटनांना टोळी असा चूकीचा शब्द वापरून दहशतवादी,नक्षलवादी, गुंडगिरी करणारे असा गैरसमज पसरवण्याचे कटकारस्थान पोलीस करीत आहेत. हा आमचा आदिवासींचा अपमान नाही तर या देशाचा व देशातील क्रांतिकारकांचा अपमान आहे.हा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. ११ जणांची संघटना म्हणून आमच्या संघटनेची टिंगल टवाळी पोलीस अधिकारी करतात. तर मग या ११ जणांची पोलिसांना का भिती? ही फक्त ११ जणांची संघटना नसून ११ लाख लोकांची संघटना आहे.या संघटनेचा मुखिया ५०६ वेळा उपोषण करणारा भारतातला एकमेव व्यक्ती आहे.ही गोष्ट पोलिसांना माहित आहे.
                         आमच्यावर खून मर्डर, दरोडा सारखे गंभीर गुन्हे दाखल नाहीत तर आम्ही सट्टा,जुगार, मटका,दारू इत्यादी अवैद्य व्यवसाय व धंदे बंद करावेत म्हणून कामे करतो,पोलिसांचे हफ्ते बंद होतील म्हणून ,भ्रष्टाचारविरोधात कामे करतो म्हणून आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे आपल्या पदाचा व कायद्याचा दुरूपयोग करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यास चूकीची वागणूक देत आहेत, अपमानित करीत आहेत, बदनाम करीत आहेत, टार्गेट करीत आहेत. 
                               देशात अनेक ठिकाणी पोलीसच सर्व सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार करीत आहेत अशा दिवसेंदिवस घटना घडत आहेत, त्यामुळे जनतेचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही.पुढा-यांच्या इशाऱ्यावर सर्व जनतेच्या रक्षणासाठी असलेली पोलीस यंत्रणाच जनतेवर अत्याचार करते.सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून नंदूरबार मधील पोलीस अधिकारी अती अत्याचार करीत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचा संयमाचा बांध फूटला आहे.म्हणून येणा-या काही दिवसांत नंदूरबार पोलिसांच्या विरोधात मोठे जन महा आंदोलन, जेलभरो आंदोलन होईल, असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments