Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत अमानुष मारहाण प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे सह पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे आरोपी!




२७ जानेवारी २०२६ रोजी नंदूरबार न्यायालयात अमानुष मारहाण प्रकरणाची सुनावणी

नंदूरबार प्रतिनिधी: जय वळवी या आदिवासी तरूणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदूरबार येथे निघालेल्या मूक मोर्चादरम्यान घडलेल्या कथित दंगल प्रकरणात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना रात्री १२.३० वाजता पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली.त्यानंतर पोलीस कस्टडीत असतांना मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे,गुन्हे अन्वेषण विभाग नंदूरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी अमानुष पणे मारहाण केली अशी तक्रार सुशिलकुमार पावरा यांनी माननीय न्यायालय नंदूरबार यांच्याकडे दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवली आहे.या अमानुष मारहाण प्रकरणात नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे सह हेमंत पाटील यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा सत्र न्यायालय नंदूरबार येथे होणार आहे.                    संबंधित आरोपी पोलिसांवर ॲस्ट्रासिटी, अमानुष पणे मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदांचा दुरूपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा,अशी मागणी तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी केली आहे.
                       पोलिसांकडून तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर सिव्हिल हाॅस्पीटल नंदूरबार येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी ॲडमीट करण्यात आले होते.तब्बल ८ तास त्यांची सिव्हिल हाॅस्पीटल मध्ये वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले.त्यानंतर वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हाॅस्पीटल नंदूरबार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी नंदूरबार यांना पत्र एमएलसी क्रमांक १३८८८ अन्वये दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुखापत प्रमाणपत्र दिले आहे. २७ जानेवारी २०२६ रोजीच्या सुनावणीत माननीय न्यायालय नंदूरबार या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments