Advertisement

वनदाव्यांसाठी बिरसा फायटर्सचे १२ जानेवारीला शहादा येथे वनभवन समोर ठिय्या आंदोलन!



शहादा प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील शहाणा,कन्साई, वडगांव व नागझिरी येथील प्रलंबित २८ वनदावे निकाली काढावेत, या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी वनभवन शहादा समोर ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन उपविभागीय वन अधिकारी शहादा व पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,मुन्ना पावरा,अजित वळवी,रविंद्र पटले,पप्पू अवाया आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    उपविभागीय अधिकारी शहादा यांनी सहा.वनसंरक्षक शहादा यांना दिनांक २१/०२/२०२४ रोजी दिलेल्या पत्रानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधि.२००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ ची अंमलबजावणी मूळ वनदाव्यांची तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरी होवून मिळणेबाबत चे पत्र पाठवले आहे.शहादा तालुक्यातील एकूण २८ वनदाव्यांबाबत अभिप्राय मागितला होता.परंतू १ वर्ष ११ महिने अधिक कालावधी होवूनही सदर वनदाव्यांबाबत अद्याप अभिप्राय आले किंवा नाही,कसे ते समजले नाही.त्यामुळे वनदावेदार पंतप्रधान पिक विमा योजना अशा विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत. म्हणून हे आंदोलन होणार आहे.या आंदोलनात सर्व वनदावेदार शेतक-यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments