उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना निवेदन
शहादा प्रतिनिधी: शहादा शहरात क्लोचिंग क्लासेस मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग करीत अत्याचार करणा-या शिक्षकाला अटक करून कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते १० दरम्यानच्या कालावधीत शहादा शहरातील क्लोचिंग क्लासेस मध्ये एका अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर तेथील शिक्षकाने विनयभंग करीत अत्याचार केल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे.योगेश अरूण शेंडे या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्यापही पोलिसांनी आरोपीस अटक केलेली नाही,अशी बातमीद्वारे माहिती मिळत आहे.अशा घटनांमुळे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.या घटनेमुळे विद्यार्थांच्या पालकांत संताप निर्माण झालेला आहे.तरी शहाद्यात कोचिंग क्लासेस मध्ये एका १७ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या शिक्षकांला तात्काळ अटक करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


0 Comments