दूधराम कावळे यांनी त्यांची कार्मिक समयसूचकता, सहज अभिनय शैली, भन्नाट संवादफेकी,अंगाभिनयाने पाहून
प्रेशक पुरता अक्षरशः लोटपोट होईन जातात. आतावर त्यांच्या अजरामर भूमिका " तूच माझी सोभाग्यवती"- संपत, ची भूमिका, "अग्निदिव्य", "सुनबाई जागी हो", "बाळा मीच तुझी आई रे!, "साता जन्माच्या गाठी", "बलिदान ", या अजरामर नाटकाच्या यशस्वी भूमिका सोबत त्यांचे सोबत, भाष्या कधी जावई अशी भूमिका करणारे कृपाल सयाम, आणि नैना खोब्रागडे यांनी त्रिवेणी विनोदी जोड गडी, यांची खास करून साथ मिळाली. यामुळे त्यांचे विनोदाला चार चांद लावन्यास मदत लाभली आहे..त्यांना झाडीपट्टीचे ओळख असलेले दादा कोंडके ( पदमश्री) डॉ परशुराम खुणे, सिनेस्टार, देवेंद्र दोडके, बहुरंगी कलावंत सिनेस्टार, राजा ( राजेश) चिटणीस, विशाल तराळ, ज्ञानेश्वरी कापगते, या
थोर दिग्गज कलावंतासह भूमिका साकारल्याने त्यांना उत्स्फूर्त करीत आहेत, त्याना प्रेरणा देतात.. त्यांन्या हिस्सातील भूमिका ह्या पुरस्काराचा मान, झाडीपट्टी प्रेशक मित्र, फालॉवर्स, साठी,त्यांचे " दूधराम " नाव हे चमकतंय व आनंदाच्या दाही दिशेने रशिकांच्या कानावर घुमते आहे.चाहत्या वर्गाकडून, त्यांचे गाव साकोली लाखांदूर विधान सभा क्षेत्रातील पार्डी गावात जल्लोष हारतुरे घेऊन स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्यांचे मिळालेले युवा सांस्कृतिक पुरस्कार हा इतरांना जीवन बदलण्यास व त्यांचे अभिनय आत्मसात करण्यास भाग पाडत आहे. यांचे श्रेय त्यांनी झाडीपट्टी, विकास महामंडळाचे स्वर बहार लेखक कवी, अनिरुद्ध बनकर, धंनजय स्मूर्ती रंगभूमी वडसा चे नितीन नाकाडे, संजू रामटेके व प्रेशक यांना दिले यामुळे भंडारा, चंद्रपूर,गोंदिया, गडचिरोली, येतील अनेक कलावन्त लेखक यापैकी, बिरसा फायटर्स व बि एम आर एफ ट्रायबल राईट्स फेडरेशन चे डॉ सुरेशकुमार पंधरे त्यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे त्यांची स्वप्ननाची उडान बेभान होत आहे व फोन वरून व सोशल मीडिया, प्रिंट मीडियातून व वडेगाव ( साकोली) वाशीयाकडून त्यांचेवर खास करून अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.
त्यांची इंडियन ट्रायबल न्युज कडून खास मुलाखात घेतली असता त्यांनी तुटपुंज्या उत्पन्न व न्हाव्याचे केशकात्रण धंदा व कलेच्या रकमेतून पार्डी या गावी प्रगत शेती केलेली आहे ते एक उत्कृष्ट आधुनिक दर्जाचे शेतकरी सुद्धा आहेत तयाचेकडे शेतीचे औषध व आधुनिक फवारणी पम्प आहे यामुळे शेतीला मुख्य व्यवसाय समजतात कारण कला ही वय व आरोग्यावर अवलंबून असून ती कधीही संपू शकते असें दूधराम म्हणतात पण शेताचे उत्पन्न अजरामर असून ती कला इतरांना अवगत असावी व जल जमीन जंगलाचे रक्षण व्हावे असें ते म्हणतात कारण कोरोना काळात अभिनय बंद होतें पण शेतीचे झाडा जंगलाचे स्वास, उत्पन्न,अभिनय सुरु होतें यामुळेच आम्ही जिवंत आहोत असें म्हणतात. त्यांना नवरात्री मधून भूमिका मिळाल्याने ते आज मोट्या स्टेजवर दिग्गजाचे सहकारी व युवकांचे मनोरंजक असल्याचे स्मित हास्य करून बोलतात. घरी वेळापत्रक असतो, कधी कुठे नाटक आहे यानुसार ते आराम करतात. पुढील दिवशी नवीन जीवनात वाटचाल करतात. त्यांच्यात एक हरहुन्नरी वेक्तीमहत्व व हजरजबाबी, गुण आहेत..
वरील संघटनेचे संस्थापक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..


0 Comments