बिबट्यांचे बंदोबस्त न झाल्यास वनविभाग कार्यालय समोर आंदोलन छेडण्यात येईल
शहादा प्रतिनिधी:-शहादा तालुक्यातील वडगाव येथे वाढत्या हिस्त्र प्राण्यांचे हल्ले करणाऱ्या बिबट्यांचे रोखण्यासाठी वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी श्रीमती मित्ताली शेठी नंदुरबार यांना देण्यात आले आहे, यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते,
निवेदनात म्हटले आहे की शहादा तालुक्यातील परिसरासह दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढून मानवावर हल्ले वाढले आहे.वडगाव शिवरात आता पर्यंत मुक्या प्राण्यांवर हल्ला केल्याने मृत्यू झाला.शहादा तालुक्यातील वडगाव परिसरात गेल्या आठवड्याभरात बिबट्याचा हल्ल्यात २/३ मुक्या प्राण्यांवर जीव गेला आहे.तेव्हा तीन बिबट्या पकडण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा,शहादा, परिसरातील तीन बिबट्या पकडण्यात आले होते परंतु,त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले.पकडलेले दोन बिबट्या गेले कुठे?वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.वारंवार घडत असलेल्या दु:खद घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.भीतीमुळे शेतातील कामही होत नाही.परिसरात नागरिकांना दररोज बिबट्ये दिसत आहे.बाहेरून नरभक्षक १५ ते २० बिबटये परिसरात सोडले असण्याची शक्यता आहे.वाढते हल्ले तात्काळ रोखण्यासाठी वन विभागाने २० ते २५ पिंजरे लावून बिबट्याना पकडून लांब अभयारण्यात सोडण्यात यावे.ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे अशी नम्र विनंती श्रीमती.कल्पना ठुबे
निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना करण्यात आली आहे


0 Comments