Advertisement

के.सी.पाडवी हेच माझे एकमेव विरोधक- सुशिलकुमार पावरा

पक्षांचे सर्वच उमेदवार दलबदलू!

धडगांव प्रतिनिधी-एकच लक्ष्य ३५ वर्षे निष्क्रिय आमदार के सी पाडवी यांना हरविणे फक्त.हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून मी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. जोपर्यंत के.सी.पाडवी यांना आमदार पदावरून हटविल जात नाय,तोपर्यंत अक्कलकुवा धडगांव तालुक्याचा विकास होणार नाही.नवीन लोकांना संधी द्या,विकास आपोआप होईल.गेल्या ३५ वर्षे केवळ काँग्रेस पक्षाच्या नावावर के सी पाडवी आमदार म्हणून निवडून येत आहेत.निवडणूक झाली की मुंबई ला जाऊन राहतात. निवडणूक जवळ आली की आपल्या गावाचे दर्शन करतात.ज्या आमदाराने स्वतःच्या गावाचा रस्ता अजून बनवलेला नाही,तो काय तालुक्यांचे रस्ते बनवेल?अक्कलकुवा विधानसभेत जिकडे बघाल तिकडे भंगारच रस्ते बघायला मिळतात. ३५ वर्षे अक्कलकुवा व अक्राणी मतदारसंघाचा सत्यानाश करून ठेवला आहे.ना रस्ताचा प्रश्न सुटला,ना आरोग्याचा ,ना रोजगाराचा.या माणसाने एकही कारखाना उद्योग या भागात आणला नाही.धड रस्ते नाहीत, बाम्बूलंसमध्ये आज ही महिलांना डिलीव्हरी साठी हाॅस्पीटल मध्ये पोहचवले जाते धडगांव अक्कलकुवा तालुक्याची अत्यंत वाईट अवस्था आहे.
                       या मतदारसंघात लोकसभेमध्ये एकत्र लढणारे,एकाच ताटात खाणारे. बरेच इच्छुक उमेदवार आता आम्ही विरोधक आहोत, आम्ही के.सी.पाडवी विरोधात लढणार आहोत, असे निवडणूक पुरते विरोध दाखवतील. परंतु त्यांना विरोधक म्हणता येणार नाही.कारण काँग्रेस चे उमेदवार के.सी.पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी निवडून आणण्यासाठी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट हे एकसाथ होते.आता आम्ही विरूद्ध उमेदवार म्हणून निवडणूक लढतील,विरोधक भासवतील, लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतील. अशा उमेदवारांवर विश्वास ठेवू नका.कारण हे सगळे रंग बदलू गिरगिट सारखे आहेत.पक्षांच्या उमेदवारांवर लोकांचा विश्वास नाही.के.सी.पाडवी ला कट्टर विरोधक असा उमेदवार या भागात कुणीच दिसत नाहीत.
                        नुसते पक्ष बघू नका,माणूस पणा बघा,तो कामाचा आहे की बिनकामाचा आहे.म्हणून अक्कलकुवा धडगांव विधानसभेचा विकास हवा असेल तर सर्वप्रथम निष्क्रिय आमदार के सी पाडवी यांना निवडणूकीत पाडले पाहिजे. निवडणूकीच्या रिंगणात अनेक उमेदवार आहेत परंतु त्यांचा मला फारसा विरोध नाही. ३५ वर्षांत आमदार असताना के सी पाडवींनी अक्कलकुवा मतदारसंघाला भकास करून ठेवले आहे.म्हणून के.सी.पाडवींना हरविण्यासाठीच मी ही निवडणूक लढवित आहे. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments