Advertisement

मनोज जरांगे पाटील, तू व तुझ्या बापाने जेवढी वेळा उपोषण- आंदोलन केली नाहीत, तेवढी वेळा मी उपोषण- आंदोलन केली- सुशिलकुमार पावरा

मनोज जरांगे पाटील यांच्या धनगरांना आदिवासींत आरक्षण देण्याच्या वक्तव्याचा बिरसा फायटर्स संघटनेने केला निषेध 

शहादा प्रतिनिधी: धनगर समाजाला आदिवासींत आरक्षण यांच्या बापालाही द्यावे लागेल, सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ,असे वादग्रस्त वक्तव्य करणा-या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करावी.ज्या समाजाबद्दल ज्ञान नाही,माहिती नाही,त्या समाजाच्या आरक्षणाबद्धल उगीच नाक खूपसू नये.मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आदिवासी समाजाच्या आरक्षणाबद्धल वादग्रस्त वक्तव्य केले होते,आदिवासींमधील घूसखोरीचे समर्थन केले होते.आताही ते घुसखोरीचे समर्थन करत आहेत. त्यांना असे वाटत असेल की,मला कोणीही आदिवासी विरोध करणार नाही.परंतु मनोज जरांगे पाटील यांना माझी खूली चेतावणी आहे,तू किंवा तुझ्या बापानेही आंदोलन केली नसतील तेवढी वेळा मी आंदोलन केली आहेत.लक्षात ठेवा. रेकॉर्ड तपासा.आदिवासींच्या वाट्याला येऊ नका.तुझ्या बापाहून मोठे बाप आदिवासींत लपलेले आहेत. आदिवासींना चिडवण्याचा प्रयत्न करू नका.
                       आदिवासी समाजाला ख-या अर्थाने ७% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही.कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची,बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे.खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोक-या हडप केल्या आहेत.७जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून,राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर,असंवैधानिक सेवासंरक्षण देण्याचा येत आहे.गैर आदिवासींनी अनेक श्रेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैर फायदा घेतलेला आहे व घेत आहेत.काही महिना पूर्वी शिंदे -फडणवीस सरकार चार हजार बोगस लोकांना बेकायदेशीर सेवा संरक्षण दिले.आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे.धनगर हे आदिवासी नाहीत, असा स्पष्ट अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ने सरकारला दिलेला आहे.तरी काही बिनडोक व अज्ञानी लोक आदिवासींमध्ये आम्हाला आरक्षण द्या,अशी चुकीची मागणी करत आहेत. अमा मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही जाहीर विरोध करतो,निषेध व्यक्त करतो,अशी जोरदार प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments