Advertisement

रांजणगाव गणपती (शेरी-वस्ती) मार्गे पिंपरी-दुमाला मार्ग रस्ता कॉक्रीट करणे मा.दिलीपराव वळसे यांच्या कडे मागणी

प्रतिनिधी:- शंकरसिंग ठाकुर 

रांजणगाव गणपती (शेरी-वस्ती) मार्गे पिंपरी-दुमाला ग्रामीण मार्ग क्र.३ रस्ता काँक्रेटी करण करणे, संदर्भात जास्तीचा निधी देण्यासंदर्भात मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील.साहेब... ( सहकार मंत्री महा. राज्य) यांच्याकडे मागणी केली असता. येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यामधे निधी मंजूर करण्याचे साहेबांनी सांगितले. त्याचप्रमाणे रांजणगाव गणपती ( शेळके-वस्ती ) जि. प. प्राथमिक शाळेंत पेव्हिंग ब्लॉक बसाविण्यासाठी निधी मिळणेबाबत,गणेगाव-खालसा येथील होले विहीर ते ढोकले-वस्ती रस्ता सुधारणा करणेबाबत यावेळी श्री.हर्षददादा जाधव‌.( मा. जिल्हाध्यक्ष भा.ज.प विद्यार्थी आघाडी ),यांनी या कामासाठी खूप दिवसापासून आग्रह धरला होता, साहेबांनी त्यासाठी लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासित केले. त्याचप्रमाणे श्री.मारुती शेळके (तालुकाध्यक्ष भाजपा), माऊली साकोरे, कविता गलांडे, स्वाती बत्ते, शरद उमाप,समाधान डोके,सचिन गव्हाणे आदी महिला भगिनी भारतीय जनता पार्टी शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदार संघ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली

Post a Comment

0 Comments