Advertisement

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणा-यांना फाशी द्या - बिरसा फायटर्सची मागणी

आरोपी एक नाही अनेक-कुटुंबियांचा आरोप

 तळोदा प्रतिनिधी : तळोदा तालुक्यातील खरवड येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणा-या आरोपींची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बोरद तळोदा जि.नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा ,राकेश ठाकरे ,पवन पावरा,एकनाथ भील आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                        तळोदा तालुक्यातील खरवड येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाॅकलेटचे आमीष दाखवून, फसवणूक शाळेच्या आवारातून एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार तळोदा पोलीस ठाण्यात मंगळवार रोजी मुलीच्या पालकांनी दिली होती.त्यानंतर शुक्रवार रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा मोड येथील एका केळीच्या शेतात मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला.सदर घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.आरोपी मनीष सतीश नाईक वय २२ राहणार लाखापूर याला पोलिसांनी पकडले आहे.या प्रकरणात फक्त एक आरोपी नाही तर आणखीन काही आरोपी शामिल असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.म्हणून सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.सदर घटनेबद्दल आदिवासी जनतेत प्रचंड संताप निर्माण झालेला आहे.दिवसेंदिवस अल्पवयीन मुलीवर अत्याचार वाढतच आहेत. म्हणून अशा घटनेसंबंधीत आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.जेणेकरून अशा प्रकारच्या घटना रोखता येतील. तरी तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणा-या आरोपींची सखोल चौकशी करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस निरीक्षक बोरद यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments