Advertisement

काँग्रेस व भाजपचे एकाच ताटात खातात- सुशिलकुमार पावरा

नंदूरबार प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक जवळ आलीय. भाजप व काँग्रेसची जिल्हा परिषद नंदूरबार मधली विचित्र युती लक्षात ठेवा.सत्तेसाठी काय पण,पैशांसाठी काय पण अशी ही भाजप व काँग्रेसची विचित्र युती आहे.नंदूरबार जिल्ह्य़ात भाजप व काँग्रेसवाले एकाच ताटात खातात. यांचे ताट व ताटात काय खातात, हे सोशल मिडीयावर आपण बघितलेलेच आहे.म्हणजेच यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत. 
                      नंदूरबार लोकसभा निवडणुक मी स्वतःच्या बळावर अपक्ष उमेदवार म्हणून लढवली.तेव्हा काँग्रेस वाले म्हणत होते,यांना भाजप वाल्यांनी उभं केल आहे.भाजप वाले म्हणत होते,हा काँग्रेसचा माणूस आहे.निवडणूक संपली.काँग्रेस व भाजप कडून आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदारांना लाखों करोडो रूपये वाटले.काँग्रेस कडून प्रत्येकी १०० रूपये तर भाजप कडून प्रत्येकी ३०० रूपये वाटण्यात आले.पैशे वाटतानाचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल सुद्धा झाले.खुले आम पैशे वाटणा-या भाजप च्या काही लोकांविरोधात मी जिल्हाधिकारी यांच्याकडे व पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली.तेव्हा जे काँग्रेस चे दलाल माझ्यावर आरोप करत होते की,यांना भाजपने उभे केलं. ते सगळे काँग्रेस चे दलाल गायब झाले.एखाद्या उंदरासारखे बिळात लपून बसले.एकाचीही हिंमत झाली नाही भाजप विरुद्ध तक्रार दाखल करायची.कारण भाजप ने जसे पैशे वाटले तसे काँग्रेस नेही पैशे वाटले.हे कुठल्या तोंडानी तक्रार दाखल करतील. काँग्रेस चा उमेदवार निवडून आल्यानंतर ३०० पर १०० रूपये भारी अशी कमेंट करायलाही या निर्लज्ज लोकांना लाज वाटली नाही.काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैशे वाटल्याची अशी कबुली दिली. 
                        आम्ही भाजप व काँग्रेस च्या घराणेशाही उमेदवाराविरूद्ध निवडणूक लढवली.म्हणून भाजप विरुद्ध तक्रार दाखल केली व तक्रारींवर ठाम राहिले.कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे.यापुढे कुणीही भाजप व काँग्रेस चा मायका लाल खुले आम मतदारांना पैशे वाटायची हिंमत करणार नाहीत.लोकसभा निवडणूकीत काँग्रेस उमेदवारासोबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट व शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट व अजित पवार गट ,त्यानंतर भाजपचे काही छूपे नेते यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. लोकसभेत हे एकाच ताटात जेवले.आता विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणार म्हणून जाहीर करीत आहेत. भाजप व काँग्रेस किंवा अन्य पक्षाचे नेते हे एकमेकांचे विरोधक असूच शकत नाहीत. रंगबदलू ,पक्ष बदलू या नेत्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये.कारण यांनी भोळ्या आदिवासी जनतेला वर्षानुवर्षे ऊल्लू बनवण्याचे काम केले.मतदारांनी आता जागृत व्हायला पाहिजे.बिनकामाच्या नेत्यांना घरी बसवले पाहिजे.नवीन उमेदवारांना संधी दिली पाहिजे.
           मी अक्कलकुवा विधानसभा निवडणुक लढवणार आहे,हे जाहीर केल्यानंतर तुम्ही फक्त समाजसेवा करा,राजकारणात येवू नका,निवडणूक लढू नका.हा त्या पक्षाची मते खाईल, तो याची मते खाईल. असे पक्षाचे दलाल कमेंट करू लागले.विशेष करून काँग्रेसचे बिळात लपलेले नागोबा डुलायला लागलेत, डोके वर करू लागलेत.मला या पक्षांच्या दलालांना सांगायचे आहे की,निवडणूक लढण्याचा अधिकार फक्त पक्षवाल्यांनाच आहे का? भाजप काँग्रेसच्या उमेदवारानेच निवडणूक लढण्याचा ठेका घेतलेला आहे का? आम्ही संघटनावाल्यांनी निवडणूक नको लढायला पाहिजे का?भारतात लोकशाही आहे.प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.मी निवडणूक लढणार व पक्षांच्या उमेदवारांना हरवून दाखवणार.ज्याच्यात दम असेल त्यांनी माझ्याविरुद्ध लढून दाखवा.लढेंगे और जितेंगे! अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे अक्कलकुवा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments