Advertisement

शिरपूर मधून ईश्वर मोरे तर रावेर मधून हसन तडवी बिरसा फायटर्स कडून विधानसभा लढण्यास इच्छुक उमेदवार

शहादा प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणूक तयारीसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा फायटर्स संघटनेची झूम मिटींग घेण्यात आली.महाराष्ट्रात बिरसा फायटर्स किती विधानसभा निवडणुक लढवणार ? इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेणे,निवडणुकीचे नियोजन करणे,याबाबत सभेत चर्चा करण्यात आली.
                            नंदूरबार जिल्ह्य़ातील अक्राणी,शहादा,नवापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ, धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर, साक्री हे २ विधानसभा मतदारसंघ, नाशिक जिल्ह्य़ातील बागलाण विधानसभा व भंडारा जिल्ह्य़ातील आमगाव देवरी विधानसभा तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा असे एकूण ९ विधानसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्स आपले उमेदवार देणार आहे.शिरपूर विधानसभेसाठी बिरसा फायटर्सचे तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे निवडणूक लढण्यास इच्छुक असून रावेर मधून बिरसा फायटर्सचे राज्य प्रसिद्धीप्रमुख हसन तडवी निवडणूक लढणार आहेत. बागलाण मधून बिरसा फायटर्सचे राज्य सचिव संजय दळवी व शहादा मधून बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे.या सभेत बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे ,राज्य सचिव संजय दळवी,राज्य महासचिव बारक्या पावरा,राज्य प्रसिद्धीप्रमुख हसन तडवी,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,धडगांव कार्याध्यक्ष मुकेश पावरा, सुरजित ठाकरे,गिरीश वळवी,प्रविण वळवी,राकेश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.बिरसा फायटर्सचे एकुण ९ विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार तयार झाले आहेत.

Post a Comment

0 Comments